मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire : पुण्यात मध्यरात्री भीषण आग; फर्निचरचे दुकान भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

Pune Fire : पुण्यात मध्यरात्री भीषण आग; फर्निचरचे दुकान भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 09:55 AM IST

Pune Fire : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर बंद असलेल्या फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली.

pune fire
pune fire

पुणे : पुण्यातील सिंहगड मार्गावरील विठ्ठलवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या एका फर्निचर दुकानाला मध्यरात्री १ वाजता आग लागली. या आगीत हजारो रुपयांचे फर्निचर आगीत भस्मसात झाले आहे. सुदैवाने या घटनेत जिवत हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी येत त्यांनी काही कालावधीत आगीवर नियंत्रण मिळवले.

ट्रेंडिंग न्यूज

सिंहगड मार्गावरील विठ्ठलवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून एक फर्निचरचे दुकान बंद अवस्थेत होते. या दुकानाला मध्यरात्री १ वाजता आग लागली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. आग एवढी भीषण होती की दूरवरुण आगीचे लोट ही दिसत होते. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. काही वेळात अग्निशामक दलाचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.

दुकानातील गोडाऊनला लागली. पोलीस आणि स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. तब्बल चार बंबाच्या साह्याने आगीवर तासांभारच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यास यश आले. ही आग नेमकी कशामुळे लागली ही समजू शकले नाही. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किट मुळे लागळ्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग