मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Women's Day : पुणे जिल्हा परिषदेच्या अनोख्या उपक्रमामुळं आठ लाख महिला बनल्या संपत्तीच्या मालक

Women's Day : पुणे जिल्हा परिषदेच्या अनोख्या उपक्रमामुळं आठ लाख महिला बनल्या संपत्तीच्या मालक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 09:29 AM IST

International Women's Day : ग्रामीण भागात महिलांना संपत्तीत वाटा मिळावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला वर्ष झाले असून या काळात तब्बल ८ लाख महिला या संपत्तीच्या मालक झाला आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम आहे.

Pune ZP Office
Pune ZP Office

पुणे : ग्रामीण भागात महिलांना संपत्तीत वाटा मिळावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेने व्यापक मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी सुरू केलेल्या या मोहिमेला आज महिला दिनी एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरात तब्बल ८ लाख १५ हजार महिलांना संपत्तीत वाटा मिळाला आहे. देशभारतील हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी झाला असून हा प्रयोग आता संपूर्ण देशात पथदर्शी ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त गेल्या वर्षी ८ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेने खास मोहीम सुरू केली. जिल्ह्यातील तीन हजारहून ग्रामपंचयातींनी महिलांना संपत्तीत वाटा देण्यासाठी घरांच्या आणि सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदविणे, याच्या माध्यमातून महिलांना घरांची मालकी देणे आणि मिळकतीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान हक्क मिळावा या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली. या साठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या संदर्भात ठराव देखील केला. या साथी जिल्हा परिषदेने मिळकतकरात सूट दिली. सुरवातिच्या काही दिवसांतच ६ लाख ४२ हजार ८६ घरांचा सातबारा उतारा आणि आठ अ उताऱ्यावर महिलांच्या नावांची नोंद करण्यात आली. आज या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले असून तब्बल ८ लाख १५ हजार ५८७ महिलांच्या नावे संपत्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख २७ हजार ७०६ कुटुंबांची नोंद आहे. यातील ८,१५,५७३ कुटुंबांनी महिलांना संपत्तीत वाटा दिला आहे. तर १,१२,१३३ महिलांना संपत्तीत वाटा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, पती-पत्नी व सून आदींच्या संयुक्त नावावरील घरे असलेल्यांना मिळकत कारात ३ टक्के सवलत देण्यात आली आहे. तर अठरा वर्षे पूर्ण असलेल्या अविवाहित मुलींच्या नावावर घर करणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती देतांना जिल्हा परीक्षेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महिलांना घरांच्या मालक बनवा, अन मालमत्ता करात सवलत मिळवा,' अशी घोषणा केली होती. त्यानंतर महिलांच्या नावावर संपत्ती करण्याची मोहीम आम्ही सुरू केली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून असा प्रकारचा उपक्रम राबविणारे म्हणून पुणे जिल्हा परिषद पहिलीच ठरली आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, महिलांना संपत्तीत वाटा मिळावा या साठी ही मोहीम गेल्या वर्षी महिला दिनाच्या दिवशी आम्ही सुरू केली होती. यात सात बाऱ्यावर नाव नोंदवणे, संपत्तीत नाव नोंदवण्याची मोहीम आम्ही सुरू केली. याला सर्व गावांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे ही योजना आज जिल्ह्यात यशस्वी झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग