मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Crime : बार्शी हादरले ! अत्याचाराची तक्रार दिल्याने अल्पवयीन पीडितेवर जीवघेणा हल्ला; दोन बोटे तुटली

Solapur Crime : बार्शी हादरले ! अत्याचाराची तक्रार दिल्याने अल्पवयीन पीडितेवर जीवघेणा हल्ला; दोन बोटे तुटली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 08:15 AM IST

Solapur Crime : सोलापूरच्या बार्शी येथे एक धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन पीडितेवर अत्याचार झाल्याने तिने याची तक्रार दिल्याने तिच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला. यात पीडिता ही गंभीर जखमी झाली आहे.

Crime
Crime

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्काडायक घटना घडली आहे. अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पडितेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात पीडिता ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला मार लागला असून तिची दोन बोटे देखील या हल्ल्यात छाटल्या गेली आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ६) रात्री आठच्या सुमारास घडली होती.

अक्षय माने आणि नामदेव दळवी अशी हल्ला करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही अल्पवयीन आहे. आरोपींनी या पीडितेवर रविवारी (दि ५) अत्याचार केले. या मुळे पीडितेने बार्शी पोलिसांत धाव घेत दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सोमवारी पीडिता आणि तिची आईही तपास प्रकरणी पोलिस ठाण्यात गेल्या.

पोलिसांना माहिती देऊन दोघी घरी आल्या. दरम्यान, आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे रात्री ८ वाजता पीडितीच्या घरी जबरदस्तीने घरात घुसले. त्यांनी त्यांच्याजवळील कोयत्याने पीडितेवर सपासप वार केले. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली गेली आहे. हल्ला केल्यावर आरोपी फरार झाले.

|#+|

यानंतर तिच्या आईने मुलीला बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी याची गंभीर दखल घेत, आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग