मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Budget Session : उद्या राज्याचा अर्थसंकल्प! आज सभागृहात नेमकं काय होणार?

Budget Session : उद्या राज्याचा अर्थसंकल्प! आज सभागृहात नेमकं काय होणार?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 10:05 AM IST

Maharashtra Budget Session : आज पासून विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. अवकाळी पाऊस, हमी भाव या सारख्या मुद्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

Vidhan Bhavan
Vidhan Bhavan

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. होळीमुळे दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, आजचे अधिवेशन ही चांगलेच गाजणार आहे. विरोधकांनी विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात राज्यात अवकाळी पासवसाने थैमान घातले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांना हमीभाव नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. या मुद्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याने आजचे आधिवेशन वादळी ठरणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवडा वादळी ठरला होता. विविध मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. हीच परिस्थिती दुसऱ्या आठवड्यातही पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन रक्कम देखील मिळाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे.

नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाहीत. आशा अनेक संकटात शेतकरी सापडल्याने विरोधक आज याच मुद्यावरून सरकारला धारेवर धरणार आहेत. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी विरोधकांची अपेक्षा आहे. कोथिंबीर, मेथी, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव नाही. अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कमी दरानं खरेदी केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील केली जाणार आहे.

आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केले जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरून स्पष्ट होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या अर्थसंकल्प उद्या ९ मार्चला सादर करणार आहेत.

IPL_Entry_Point