Pusad Copy Case : पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pusad Copy Case : पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर गुन्हा

Pusad Copy Case : पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर गुन्हा

Mar 07, 2023 12:47 PM IST

Pusad Copy Case : यवतमाळ जिल्ह्यातील पुसत येथील काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात सामूहिक कॉपी प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पुसद कॉपी प्रकरण
पुसद कॉपी प्रकरण

pusad Copy Case : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात थेट शिक्षक सहभागी असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल परीक्षा विभागाने घेतली आहे. या प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे. या परिखा सुरळीत पार पडाव्या यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. यासाठी कॉपी मुक्त अभियान चालवण्यात आले आहे. मात्र, या अभियानाचा फज्जा उडल्याचे चित्र राज्यात आहे. पुण्यातील दौंड येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुसद येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

काटखेडा येथील सेंटरवर बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान मोठ्या प्रमाणात काही जन बाहेरून कॉपी पुरवत होते. यासाथी या केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती. मात्र, हा प्रकार सुरू असतांना केंद्रावरील शिक्षक काहीच कारवाई करत नव्हते. या पूर्वीही उपजिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याच विद्यालयात धाड टाकून पोतेभर कॉपी जप्त केली होती. दरम्यान, या प्रकरणी केंद्र संचालकासह ८ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ मार्च रोजी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांसमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर