मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Onion Price : नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी! पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे भेट म्हणून पाठवले कांदे

Onion Price : नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी! पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे भेट म्हणून पाठवले कांदे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 04:05 PM IST

Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने नगरच्या शेतकऱ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पार्सलने कांदे पाठवले आहेत.

Onion Price
Onion Price

अहमदनगर : कांद्याला भाव नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पानी आणले आहे. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी मेटकुटीला आला आहे. अजूनही कांद्याला हमी भाव नसल्याने या प्रश्नावर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबवला आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टामार्फत कांदे भेट पाठवले आहे. तसेच गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे.

राज्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न सध्या चंगलाच पेटला आहे. काल नाशिकच्या येवला येथील मातुलठाण गावातील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतातील कांद्याची होळी केली. तर काही शेतकऱ्यांनी थेट कांद्याच्या पिकावर नांगर फिरवला. या मध्यमातून त्यांनी सरकारला या प्रश्नावर धारेवर धरले आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे आता शेतकऱ्यांना समजले आहे.

त्यामुळे नाफेडसह केंद्र आणि राज्य सरकार विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये किलोचा भाव मिळाला. १७ गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला. यामुळे सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे या मागणीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पार्सलने कांदे पाठवत तसेच गळ्यात कांद्याची माळ घालत शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग