मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: चारित्र्याचा संशय! मद्यपी बापाने ९ वर्षीय मुलीसमोर केला आईचा खून

Pune Crime: चारित्र्याचा संशय! मद्यपी बापाने ९ वर्षीय मुलीसमोर केला आईचा खून

Aug 02, 2022, 07:24 PM IST

    • पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका मद्यपी बापाने त्याच्या मुलीसमोर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Crime News (HT_PRINT)

पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका मद्यपी बापाने त्याच्या मुलीसमोर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    • पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका मद्यपी बापाने त्याच्या मुलीसमोर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पुण्यात पिंपरी चिंचवड येथील वकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका मद्यपीने त्याच्या ९ वर्षीय मुलीसमोर तिच्या आईचा खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला पकडले आहे. या घटनेमुळे ३ मुले उघड्यावर आले आहेत. ही घटना सोमवारी रात्री घडली.

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

ललिता पुजारी अस खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रमेश पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश हा नेहमी मद्यपान करायचा. दारूच्या आहारी गेल्याने त्याचे पत्नी ललिता हिला त्यांच्या मुलांसमोरच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. त्यांना पाच वर्षांचा मुलगा, नऊ वर्षीय मुलगी आणि तिसरी मुलगी हॉस्टेलला राहते. सोमवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. त्याचा राग अनावर झाल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने त्याने ललिताच्या डोक्यात फरशी घातली. यावेळी त्याची मुलगी त्या ठिकाणीच होती. गंभीर जखमी झालेली ललिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान पोलिसांनी आरोपी रामेशला अटक केली आहे. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्याची तिन्ही मुले आता पोरकी झाली आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा