मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: तक्रारीसाठी ऑनलाइन शोधलेला नंबर निघाला सायबर चोरट्याचा; फोन हॉलडवर ठेवत महिलेला घातला गंडा

Pune Crime: तक्रारीसाठी ऑनलाइन शोधलेला नंबर निघाला सायबर चोरट्याचा; फोन हॉलडवर ठेवत महिलेला घातला गंडा

Jul 31, 2022, 01:30 AM IST

    • सायबरचोरट्याने महिलेला होल्ड वर ठेवत तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
Crime News (HT_PRINT)

सायबरचोरट्याने महिलेला होल्ड वर ठेवत तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

    • सायबरचोरट्याने महिलेला होल्ड वर ठेवत तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

Pune Crime news पुण्यात एका महिलेले बँकेत तक्रार देण्यासाठी गुगल करत ऑनलाइन नंबर शोधला. मात्र हा नंबर सायबर चोरट्यांचा निघाला. या चोरट्याने महिलेला होल्ड वर ठेवत तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल फरार! तपास पथक शोधात

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला गृहिणी आहे. तिचे पती हे दुबईला असतात. ते पत्नीच्या स्टेट बँकेतील खात्यावर पैसे पाठवत असे. जुलै २०२१ पासून त्यांना बँक खात्यासंदर्भात अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. तेव्हा त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यांना बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना एसबीआय ॲप डाऊनलोड करायचा सल्ला दिला. त्यानंतरही अडचणी दूर न झाल्याने त्यांनी ३१ जुलै रोजी गुगलवरून एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर फोन केला. त्यावरील पुरुषाने त्यांना ॲनिडेक्स व टेक्स्ट मेसेजचा ॲप असे दोन वेगवेगळे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही ॲप डाऊनलोड केले. त्यावर त्यांनी आपले बँक खात्याची माहिती भरली. तेव्हा कस्टमर केअरवरील पुरुष त्यांना वारंवार एरर येत असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीला मोबाईल होल्ड करून ठेवण्यास सांगितले.

 अर्धा तास फोन होल्डवर असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मुलीला कार्ड देऊन मिनी स्टेटमेंट काढण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या खात्यातून पेटीएम, ॲमेझाॅन, क्विक सिल्व्हर अशा वेगवेगळ्या ऑनलाइन ट्रान्झक्शनमधून पैसे काढल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी फोन कट करून दोन्ही ॲप डिलीट केले. तसेच त्यांच्या खात्यातून चित्तरंजन रेल्वे स्टेशन येथील एटीएममधून पैसे काढले गेल्याचे समजले. अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या खात्यातून २ लाख २२ हजार ९४६ रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढले गेले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या