मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: संतापजनक ! गैरवर्तनाला विरोध केल्याने मुलीच्या अंगावर ओतले मिरचीचे पाणी

Pune Crime: संतापजनक ! गैरवर्तनाला विरोध केल्याने मुलीच्या अंगावर ओतले मिरचीचे पाणी

Jul 31, 2022, 10:58 PM IST

    • पुण्यातील पिंपरी येथे एक संताप जनक घटना उघडकीस आली आहे. काही तरुण एका मुलीसोबत गैरवर्तन करत होते. याला त्या तरुणीने विरोध केल्याने तिच्या अंगावर मिरचीचे पाणी ओतण्यात आले.
Pune crime (HT_PRINT)

पुण्यातील पिंपरी येथे एक संताप जनक घटना उघडकीस आली आहे. काही तरुण एका मुलीसोबत गैरवर्तन करत होते. याला त्या तरुणीने विरोध केल्याने तिच्या अंगावर मिरचीचे पाणी ओतण्यात आले.

    • पुण्यातील पिंपरी येथे एक संताप जनक घटना उघडकीस आली आहे. काही तरुण एका मुलीसोबत गैरवर्तन करत होते. याला त्या तरुणीने विरोध केल्याने तिच्या अंगावर मिरचीचे पाणी ओतण्यात आले.

पुणे : पुण्यात पिंपरी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीची काही तरुण छेड काढत होते. तिच्याशी ते गैरवर्तन करत होते. याला त्या तरुणीने विरोध केल्याने आरोपी नराधमांनी मिरचीचे पाणी ओतले. तसेच त्या तरुणीचा विनयभंगही केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली गावठाणात ही घटना शनिवारी (दि २९) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. कृष्णा भाऊ मोरे (वय २७, रा. जाधववाडी, चिखली), कुणाल भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणीने तक्रार दिली आहे.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, आयरोपी आणि पीडित तरुणीची जुजबी ओळख आहे. शनिवारी दुपारी ही तरुणी कामानिमित बाहेर जात होती. यावेळी आरोपींनी तिचा पाठलाग केला. काही अंतरावर तिचा हात पकडत आरोपी तिच्याशी लगट करू लागले. याला या तरुणीने विरोध केला असता तू आम्हाला आवडतेस, असे आरोपी कृष्णा मोरे म्हणाला. त्यानंतर कुणाल भंडारी याने तरुणीला जवळ ओढत तिचा विनय भंग केला. या सर्व प्रकाराला तरुणीने तीव्र प्रतिकार केला. यावेळी आरोपींनी तिच्या अंगावर मिरचीचे पाणी ओतले. तू आमच्या विरोधात तक्रार केली तर तुला सोडणार नाही, अशी धमकीही दिली. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. तरुणी पोलिसात गेल्यावर तिच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करत आरोपींना अटक करण्यात आली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या