मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक! कबुतरांच्या त्रासाची तक्रार केल्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime : धक्कादायक! कबुतरांच्या त्रासाची तक्रार केल्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

Jul 29, 2022, 09:29 PM IST

    • कबुतरांच्या होणाऱ्या त्रासामुळे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे
पुणे क्राइम

कबुतरांच्या होणाऱ्या त्रासामुळे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे

    • कबुतरांच्या होणाऱ्या त्रासामुळे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे

पुणे : पाळीव कबुतरांच्या होणार्‍या त्रासामुळे पोलिसांकडे याची तक्रार केल्याच्या कारणातून कोयत्याने वार करून खुनी हल्ला करणार्‍या तिघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

याप्रकरणी हल्ला करणार्‍या तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपेश चव्हाण (43, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि एक संशयीत आरोपी शेजारी शेजारी राहतात. संशयीत आरोपींकडे कबुतरे होती. त्या कबुतरांच्या विष्टेचा आणि पंखाचा त्रास फिर्यादी यांना होत असल्याने त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. मे महिन्यात मुंढवा पोलिसांनी संशयीत आरोपींना याबाबत समज दिली होती. त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळील कबुतरे सोडून दिली होती.

याचा वादातून साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर त्यांनी कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले. हा प्रकार गुरूवारी (दि.28) रात्री आठ वाजता न्यु स्वागत चिकन अ‍ॅण्ड फिश दुकानासमोर घोरपडी गाव येथे घडला.

-------

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या