मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chembur Crime Crime : धार्मिक परंपरा न पाळल्यानं पतीनं चिरला पत्नीचा गळा; चेंबूरमधील संतापजनक घटना

Chembur Crime Crime : धार्मिक परंपरा न पाळल्यानं पतीनं चिरला पत्नीचा गळा; चेंबूरमधील संतापजनक घटना

Sep 27, 2022, 10:38 AM IST

    • Mumbai Crime Crime : आरोपी पतीनं पत्नीकडे मुलाचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानं पतीनं भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला.
Chembur Mumbai Crime Crime (HT_PRINT)

Mumbai Crime Crime : आरोपी पतीनं पत्नीकडे मुलाचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानं पतीनं भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला.

    • Mumbai Crime Crime : आरोपी पतीनं पत्नीकडे मुलाचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानं पतीनं भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला.

Chembur Mumbai Crime Crime : आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर पत्नीनं धार्मिक प्रथा न पाळल्यानं पतीनं पत्नीची भररस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली असून या टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

Weather Updates: कोकणच्या तापमानात वाढ; मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इक्बाल शेख आणि रुपाली चंदनशिवे यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मिय विवाह केला होता. लग्न केल्यानंतर रुपाली काही दिवसांनी पती इक्बाल यांच्या घरी राहायला आली होती. परंतु त्यावेळी इक्बाल आणि त्याच्या कुटुंबियांनी रुपालीला मुस्लिम धर्माच्या प्रथांचं पालन करायला सांगितलं. परंतु रुपालीनं त्यास नकार दिल्यानं त्यांच्यात वाद होऊ लागला. त्याच काळात इक्बाल आणि रुपाली यांना एक मुलगाही झाला होता. परंतु सातत्यानं वाद होत असल्यानं रुपाली गेल्या सहा महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत होती.

रस्त्यातच पत्नीचा गळा चिरून पती फरार...

आरोपी इक्बाल शेख यानं पत्नी रुपाली चंदनशिवेला भेटण्यासाठी चेंबूरमधील नागेवाडीत बोलावलं. त्यावेळी रुपालीनं इक्बालकडे घटस्फोटाची मागणी केली, परंतु इक्बालनं त्याला नकार दिला. त्यानंतर इक्बालनं मुलाचा ताबा मागितला, त्याला रुपालीनं नकार दिल्यानं दोघांमध्ये प्रचंड वादावादी झाली. त्यानंतर इक्बाल रुपालीला दुसऱ्या एका गल्लीत घेऊन गेला आणि तिच्या गळ्यात भररस्त्यात धारदार शस्त्रानं केले. स्थानिकांनी हा प्रकार पाहून आरडाओरड केल्यानं आरोपी इक्बालनं घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी...

रुपालीसोबत लग्न करण्याआधी इक्बालचा विवाह झालेला होता. परंतु त्याला पहिल्या पत्नीपासून अपत्य होत नसल्यानं त्यानं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर रुपाली आणि इक्बाल यांच्यात प्रेमसंबंध तयार झाल्यानं त्यांनी लग्न केलं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर धार्मिक प्रथांचं पालन करण्यासाठी इक्बालच्या कुटुंबियांनी रुपालीवर दबाव टाकायला सुरुवात केली होती. त्यानंतर आता आरोपी पती इक्बालनं पत्नी रुपालीची हत्या केली आहे.

या घटनेबाबत टिळकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आला आहे. घटनेच्या काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा