मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathwada : नवरात्रीसाठी खरेदी केलेल्या भगरीतून ३७ लोकांना विषबाधा; मराठवाड्यात खळबळ

Marathwada : नवरात्रीसाठी खरेदी केलेल्या भगरीतून ३७ लोकांना विषबाधा; मराठवाड्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 09:14 AM IST

Food Poisoning In Marathwada : नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या भगरीचं सेवन केल्यानं औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३७ लोकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Food Poisoning In Marathwada : नवरात्रीसाठी खरेदी केलेल्या भगरीचं सेवन केल्यानं औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३७ लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनमध्ये १३ तर जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये २४ लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अजून समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात नवरात्रीनिमित्त अनेक लोकांनी भगर आणि भगरीचं पीठ खरेदी केलं होतं. परंतु त्याचं सेवन केल्यानं १३ लोकांना उलट्या होऊ लागल्या, याशिवाय काही लोकांना चक्कर येण्यासह पोट दुखायला लागलं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

जालन्यात २४ जणांना विषबाधा...

औरंगाबादेत १३ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आल्यानंतर त्याचवेळी जालना जिल्ह्यातील परतूरमध्येही २४ लोकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी असून या सर्व बाधितांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नातेवाईकांमध्ये संताप...

भगर खाल्ल्यानं कुटुंबातील लोकांना बिषबाधा झाल्याचं समजताच त्यांच्या नातेवाईकांनी दुकानदारांविरोधात संताप व्यक्त केला आहे. याशिवाय हा प्रकार दोन जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यानं मार्केटमध्ये आलेली संपूर्ण भगर ही विषयुक्त असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता बाधितांच्या नातेवाईकांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग