मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cow Protest Gujarat : गोशाळाचालकांचा मतदानावर बहिष्कार; १५०० गायी रस्त्यावर सोडल्यानं सरकार अडचणीत

Cow Protest Gujarat : गोशाळाचालकांचा मतदानावर बहिष्कार; १५०० गायी रस्त्यावर सोडल्यानं सरकार अडचणीत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 02:58 PM IST

Banaskantha News : गोशाळाचालक गायींना न्यायालयं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून सोडत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी गायींमुळं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Cow protest in gujarat
Cow protest in gujarat (HT)

Cow protest in gujarat : गोशाळांचा आणि गायींचं संगोपन करणाऱ्या संस्थांचा निधी रोखल्याच्या निषेधार्थ गुजरातमध्ये स्थानिक लोकांनी हजारो गायींनी रस्त्यावर सोडून दिलं आहे. अनेक लोकांनी गोशाळेतील गायींना न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सरकारी कार्यालयाच्या परिसरात आणून सोडलं आहे. त्यामुळं आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील भाजप सरकारविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गायींच्या चाऱ्यासाठी आणि त्यांच्या गोठ्यांच्या उभारणीसाठी सरकार पैसै देत नसल्यानं अनेक ठिकाणी गायीचं संगोपन करणाऱ्या लोकांनी गायी मोकाट सोडून दिल्या आहेत. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बनासकांठा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याची घोषणाबाजी करत गायींना सरकारी कार्यालयांवर आणून सोडलं जात असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याशिवाय कच्छमधीलही गोशाळाचालकांनी गोशाळांच्या चाव्या केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय या गोशाळाचालकांनी घेतला आहे.

बनासकांठा जिल्ह्यात आतापर्यंत १७५० गायी रस्त्यावर सोडून देण्यात आल्या आहेत. बनासकांठामध्ये साडेचार लाख गायींचा संभाळ विविध संस्थांमार्फत करण्यात येतो. मात्र आता या संस्थांनीच आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं राज्यातील भाजप सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

गुजरातमध्येही 'लाव रे तो व्हिडिओ'चा ट्रेंड...

गोशाळा बंद करून काही आंदोलकांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल केले आहे. त्यात मुख्यमंत्री पटेल हे गौभक्त असल्याचं सांगत गोशाळांसाठी ५०० कोटींची तरतूद केल्याचं सांगत आहे. त्यामुळं आता ऐन विधानसभा निवडणुकीआधीच भाजपचं सरकार अडचणीत आलं आहे. याच प्रकरणावरून आता विरोधकांनीही भाजप सरकारला घेरायला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point