मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajasthan Politics : पायलट-गेहलोतांच्या वादात सीपी जोशींची CM पदासाठी फिल्डिंग; आमदारांचाही पाठिंबा

Rajasthan Politics : पायलट-गेहलोतांच्या वादात सीपी जोशींची CM पदासाठी फिल्डिंग; आमदारांचाही पाठिंबा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 12:40 PM IST

Political Crisis In Rajasthan : मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळं आता राजस्तानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून घमासान सुरू झालं आहे.

CM Ashok Gehlot vs Sachin Pilot In Rajasthan
CM Ashok Gehlot vs Sachin Pilot In Rajasthan (HT)

CM Ashok Gehlot vs Sachin Pilot In Rajasthan : मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्यानं आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरून राजस्थान कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वादंग पेटलं आहे. कारण आता सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री केल्यास ८५ ते ९० आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय अशोक गेहलोत हे मुख्यमंत्रीपद सोडून कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्यानं आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. कारण आता या सगळ्या गोंधळात विधानसभेचे सभापती आणि कॉंग्रेस नेते सीपी जोशी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी सचिन पायलट यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केलं होतं. परंतु आता काही आमदारांनी सीपी जोशींना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. याआधीच पक्षाच्या ९२ आमदारांनी सचिन पायलटांना मुख्यमंत्री केल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता किमान २० आमदारांनी सीपी जोशींना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षाचा गोंधळ आणखी वाढला आहे.

कोण आहेत सीपी जोशी?

राजस्थान कॉंग्रेसमध्ये सर्वात जुन्या आणि अनुभवी नेत्यांपैकी एक नाव सीपी जोशी यांचं घेतलं जातं. त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रिपद संभाळलं होतं. याशिवाय २०१८ मध्ये पायलट आणि गेहलोतांमध्ये झालेल्या वादात त्यांनी गेहलोतांना पाठिंबा दिला होता. कॉंग्रेस नेते राहुल गांधीचे ते निकटवर्तीय मानले जात असल्यानं ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाजी मारण्याची शक्यता आहे. २००८ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची सुवर्णसंधी होती. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा केवळ एका मतानं पराभव झाला होता.

IPL_Entry_Point