मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana Accident News : बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, १ ठार, २१ जखमी

Buldana Accident News : बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, १ ठार, २१ जखमी

Jan 20, 2023, 06:33 AM IST

    • Buldana Samruddhi Mahamarg Accident Accident News : समृद्धी मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बुलढाणा येथे या मार्गावर एक खासगी ट्रॅव्हल बस उलटली असून यातील एका प्रवासी ठार झाला असून २१ जण जखमी झाले आहे.
बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, १ ठार, २१ जखमी

Buldana Samruddhi Mahamarg Accident Accident News : समृद्धी मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बुलढाणा येथे या मार्गावर एक खासगी ट्रॅव्हल बस उलटली असून यातील एका प्रवासी ठार झाला असून २१ जण जखमी झाले आहे.

    • Buldana Samruddhi Mahamarg Accident Accident News : समृद्धी मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बुलढाणा येथे या मार्गावर एक खासगी ट्रॅव्हल बस उलटली असून यातील एका प्रवासी ठार झाला असून २१ जण जखमी झाले आहे.

बुलढाणा : विकासाचा समृद्धी महामार्ग हा आता अपघाताचा मार्ग ठरू लागला आहे. या मार्गावर काही ना काही अपघात रोज पुढे येत आहे. असाच एक अपघात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला आहे. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे. एक भरधाव खासगी बस महामार्गावर उलटली असून, बस मधून बाहेर पडत असतांना दोन प्रवाशांना महामार्गावरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने चिरडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. बस मधील २१ प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही. राही ट्रॅव्हल्सची खासगी लक्झरी बस (बस क्र. MH 20 EL4999) ही पुढे प्रवासाला जात असतांना समृद्धी मार्गावर हा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस महामार्गावर पलटी झाली. ही बस नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जात होती.

पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना झाली. बस पलटी झाल्यावर बस मधील प्रवासी हे बाहेर येण्याच्या प्रयत्न करत होते. यातील दोन प्रवासी हे बाहेर निघाल्यावर या महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांना चिरडले. यात एक प्रवासी हा जागीच ठार झाला तर दूसरा गंभीर जखमी झाला. शिवाय बस पलटी झाल्याने बस मधील २१ प्रवासी हे जखमी झाले आहेत.

दरम्यान, जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त बस ही बाजूला करण्यात आली आहे. तसेच ह्या मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत केली जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा