मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गट दसरा मेळावा.. अर्जून खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात, ८ ते १० गाड्या धडकल्या!

शिंदे गट दसरा मेळावा.. अर्जून खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात, ८ ते १० गाड्या धडकल्या!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 04, 2022 08:19 PM IST

दसरा मेळाव्यासाठी उद्घाटन न झालेल्यासमृद्धी महामार्गावरून (samrudhi highway) निघालेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. दौलताबादजवळ ८ते१० गाड्याएकमेकांनाधडकल्या आहेत.

अर्जून खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात
अर्जून खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात

औरंगाबाद –शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला इतके महत्व प्राप्त झाले आहे. शिवसैनिकांसाठी उद्याचा दिवस खूप मोठा असणार आहे. कारण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्घाटन न झालेल्या समृद्धी महामार्गावरून निघालेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. दौलताबादजवळ ८ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसाठी उद्घाटना आधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात करण्यात आल्याने मोठा वाद रंगलाअसतानाच आता यावर अपघात झाला आहे.

ताफ्यात पुढे जाणाऱ्या गाडीने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. औरंगाबादवरून ५०० वाहनांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मात्र महामार्ग अद्याप सुरू झाला नसतानाही त्यावरून प्रवास करताना अपघात झाल्याने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे.

ठाकरे व शिंदे गटाच्या वतीने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा हा मुंबईच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला गर्दी म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून आज मुंबईत दाखल होत आहेत. शिंदे गटाकडून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नियोजन करण्यात आलं आहे. या घडामोडींमधील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नेत्यांना देण्यात येत असलेली मुभा. समृद्धी महामार्गाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही. त्यामुळे हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी बंद आहे. पण शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग आज खुला करण्यात आला.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या