मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हिंदी भाषिकांनी महाराष्ट्राकडून 'हा' एक गुण घ्यावा; भगतसिंह कोश्यारींचा सल्ला

हिंदी भाषिकांनी महाराष्ट्राकडून 'हा' एक गुण घ्यावा; भगतसिंह कोश्यारींचा सल्ला

Jun 04, 2022, 05:20 PM IST

    • 'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावरील एका चर्चासत्रात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राच्या लोकांचं भरभरून कौतुक केलं आहे.
भगतसिंह कोश्यारी

'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावरील एका चर्चासत्रात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राच्या लोकांचं भरभरून कौतुक केलं आहे.

    • 'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावरील एका चर्चासत्रात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राच्या लोकांचं भरभरून कौतुक केलं आहे.

'हिंदी भाषिक लोक हे केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठी शिवाय हिंदी भाषा देखील उत्तम बोलतात. अनेकदा महाराष्ट्र व गुजरात मधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचागुण आपण घेतला पाहिजे, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबईथील राजभवनात 'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या या संमेलनाचं उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी ते बोलत होते.

'एखादी भाषा केवळ लिहून किंवा वाचून येत नाही. तर भाषा ऐकून, व्यवहारात आणून व बोलून चांगली आत्मसात होते. उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊँनी व इतर भाषा बोलल्या पाहिजेत. मुलांना शिकविल्या पाहिजेत. आपापसात आपल्या भाषेत बोललं पाहिजे तसंच, आपल्या भाषेत लघुपट, माहितीपट, व सिनेमांची निर्मिती केली पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. भाषा प्रसारासाठी मिशन मोडवरच काम केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

'मी कुमाऊं प्रदेशात जातो, त्यावेळी लोकांशी कुमाऊँनी भाषेतच बोलतो, असं सांगताना कुमाऊंनी - गढवाली भाषांमध्ये विपुल साहित्य आहे. एकापेक्षा एक सरस वाक्प्रचार व म्हणी आहेत. हिंदी सिनेमामुळं जसा हिंदी भाषेचा प्रचार प्रसार झाला तसा कुमाऊँनी - गढवालीया भाषांचा प्रसार त्या भाषेतील लोकगीतांमधून होतो, असं राज्यपाल म्हणाले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्यानं मी सर्व विद्यापीठांना दीक्षांत समारोहाचं संचालन इंग्रजीतूनन करता मराठी भाषेतून करण्याचा आग्रह धरला व आज सर्व विद्यापीठं आवर्जून मराठी भाषेतून सूत्रसंचालन व भाषणं करतात, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

उत्तराखंडची सामायिक भाषा हवी!

छत्तीसगड, झारखंड या नव्यानं निर्माण झालेल्या राज्यांना देखील स्वतःची भाषा आहे, परंतु उत्तराखंडला स्वतःची सामायिक भाषा नाही. उत्तराखंड येथे गढवाली, कुमाऊँनी यांसह १४ बोलीभाषा आहेत. या दृष्टीनं राज्याची एक प्रातिनिधिक सामायिक भाषा विकसित झाली पाहिजे, असं मत साहित्यिक डॉ. राजेश्वर उनियाल यांनी मांडले.

भाषा राजाश्रयानंच वाढते, त्यामुळं शासनानं उत्तराखंडच्या भाषांना प्रोत्साहन द्यावं व त्यादृष्टीनं समितीचं गठन करावं, असं मत ज्येष्ठ साहित्यिक व भाषाविद डॉ. बिहारीलाल जलंधरी यांनी व्यक्त केलं. 'उत्तराखंड राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील अनेक शब्द मिळते जुळते आहेत. त्यामुळं सर्व भाषांना संगठीत करून उत्तराखंडी भाषा बनवावी, अशी अपेक्षा डॉ. अशा रावत यांनी व्यक्त केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा