मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : जमीन खरेदी-विक्री प्रकरणी महिलेची फसवणूक; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

Pune Crime : जमीन खरेदी-विक्री प्रकरणी महिलेची फसवणूक; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

Mar 31, 2023, 08:04 AM IST

  • Pune Crime : पुण्यात भाजपचे माजी नगर सेवक संजय घुले यांच्यावर जमीन-विक्री प्रकरणात महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime (HT_PRINT)

Pune Crime : पुण्यात भाजपचे माजी नगर सेवक संजय घुले यांच्यावर जमीन-विक्री प्रकरणात महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Pune Crime : पुण्यात भाजपचे माजी नगर सेवक संजय घुले यांच्यावर जमीन-विक्री प्रकरणात महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : एका महिलेची जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

संजय घुले असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. घुले यांच्यासह आणखी तिघनविरोधात फसवणूक, अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत घुले (दोघे रा. महंमदवाडी, हडपसर), गणेश चौंधे (वय ५२) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतर दोघांची नावे आहेत. या प्रकरणी मधुरा रामदास गायकवाड (वय ४२, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय घुले कौसरबाग-महंमदवाडी प्रभाग क्रमांक-२६ मधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. घुले यांची महंमदवाडी परिसरातील सर्व्हे क्रमांक ७ येथे मोकळी जागा आहे. घुले यांनी या जागेतील अडीच गुंठे जागा गायकवाड यांना ५५ लाख रुपयात त्यांनी विकली होती. जागा खरेदी व्यवहारात सुरुवातीला गायकवाड यांच्याकडून १२ लाख रुपये घेण्यात आले होते.

गायकवाड यांनी घुले यांच्याकडे खरेदीखताबाबत विचारणा केली होती. तेव्हा संबंधित जागेची दुसऱ्या एका व्यक्तीला विक्री केल्याची माहिती गायकवाड यांना समजली. त्यानंतर गायकवाड यांना घुले यांना विचारणा केली. तेव्हा घुले यांनी शिवीगाळ करुन धमकावले होते. या प्रकरणी घुले यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यासाठी गायकवाड यांनी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा