मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Supply : मुंबईकरांनो आजपासून पाणी जपून वापरा; पुढील १५ दिवस पाणीकपात

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो आजपासून पाणी जपून वापरा; पुढील १५ दिवस पाणीकपात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 31, 2023 09:43 AM IST

Mumbai Water Supply news : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होऊ लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Pune Water Supply News Live Updates
Pune Water Supply News Live Updates (HT)

Mumbai Water Supply news : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होऊ लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. परिणामी या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे पुढील एक महिना मुंबईत पाणी कपात केली जाणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पाणीकपात मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याला लागू असणार असल्याने या ठिकाणी सुद्धा पाणी कपात होणार असल्याची माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे पाणी गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम आज पासून सुरु करण्यात येणार आहे. या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणी कपात लागू राहणार आहे.

मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचली. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.

त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना मुलुंड जकात नाका परिसरातील पालिकेच्या २ हजार ३४५ मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस हानी पोहोचली आहे. त्यातून गळती होऊ लागल्याने पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून दोन दिवस काही भागात पाणी कपात केली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग