Pune Crime : सोशल मीडियावरील ओळख वृद्धाला पडली महागात; अश्लील ध्वनिचित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत लाखोंनी गंडवले
Pune Crime : आज काल सोशल मीडियाचे फॅड फार वाढले आहे. तरूणांपासून ते जेष्ठ नगरिकापर्यन्त अनेकजण यात वाहवत आहे. यातून फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. असेच एक प्रकरण पुढे आले असून एका तरुणीने वृद्धाला साडेचार लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
पुणे : सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवा फंडा अवलंबवला आहे. या साठी सोशल मिडियाचा वापर चोरटे करत आहेत. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्धाची ओळख सोशल मिडियातून एका तरुणीशी झाली होती. मात्र, या तरुणीने या वृद्धाला गंडवत त्यांच्यातील अश्लील ध्वनिचित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडून तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनीत राहायला आहेत. ते खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर एका महिलेने फोन करत त्यांच्याशी गोड बोलून ओळख वाढवली.
यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढवले. दरम्यान, त्यांच्यात झालेले अश्लील संभाषण रेकॉर्ड करत त्या तरुणीने तिच्या साथीदारसह धमकवण्यास सुरुवात केली. बदनामी होण्याच्या भीतीने या वृद्ध नागरिकाने तब्बल ४ लाख ६६ रुपयांची खंडणी या तरुणीला दिली. मात्र, पैसे देऊनही त्यांनी त्यांना धमकावून जादा रकमेची मागणी केली. या नंतर या नागरिकाने सायबर गुन्हे शाखेत या प्रकरणी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत
पुण्यात सेक्सटाॅर्शनच्या घटनांमध्ये वाढ
पुण्यात सेक्सटाॅर्शनच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वृद्ध नागरिक तरुणांना जाळ्यात फसवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे वाढले आहे. यातून अनेक गैर प्रकार होत आहेत. पुण्यात अशीच एका तरुणाला समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याने दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.