Central Rialway : रेल्वेचे प्रवाशांना 'समर गिफ्ट' ? पाच 'समर स्पेशल' गाड्यांच्या सुरू केल्या तब्बल ९८ नव्या फेऱ्या
central Railway summer special train : रेल्वेने प्रवाशांसाठी उन्हाळ्याचे खास गिफ्ट आणले आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ५ उन्हाळी स्पेशल गाड्या सुरू केल्या असून तब्बल ९८ जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे : प्रवाशांना उन्हाळी सुट्टी मजेत घालवता यावी या साठी मध्य रेल्वेने पाच समर स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांच्या तब्बल ९८ नव्या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या कार्यालयाने या बाबत वेळापत्रक जाहीर केले असून यामुळे उन्हाळ्यात स्पेशल ट्रीप प्लॅन करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पुण्यातून तिरूपती, गोवा, केरळ, कर्नाटक, जम्मू यासह विविध ठिकाणी जारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची ही गैर सोय बघता या नव्या पाच गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
अशी धावणार समर स्पेशल ट्रेन
१) पुणे - सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या) रेल्वे नं. ०१२११ ही विशेष रेल्वे पुण्याहून २ एप्रिल ते ४ जून दरम्यान दर रविवारी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१२ ही विशेष रेल्वे ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर बुधवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास पुण्याला पोहोचेल. ही रेल्वे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
२) पनवेल - करमाळी (गोवा) स्पेशल (१८ फेऱ्या) रेल्वे नं. ०१२१३ ही विशेष रेल्वे पनवेल येथून ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान दर सोमवारी रात्री साडे नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास करमाळी (गोवा) येथे पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१४ ही विशेष रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास करमाळी (गोवा) येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास पनवेल येथे पोहोचेल. ही रेल्वे रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबेल.
३) पनवेल - सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या) रेल्वे नं. ०१२१५ ही विशेष रेल्वे पनवेल येथून ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊच्या सुमारास सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१६ विशेष रेल्वे ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान दर सोमवारी सावंतवाडी रोडवरून सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री पावणे नऊच्या सुमारास पनवेलला पोहोचेल. ही रेल्वे रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपलूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
४) लोकमान्य टिळक टर्मिनस - कन्याकुमारी (१८ फेऱ्या) रेल्वे नं. ०१४६३ विशेष रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ एप्रिल ते १ १ जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी चार वाजता एलटीटी येथून निघेल. ही रेल्वे ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव (गोवा), कारवार, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावला चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन ला थांबेल.
५) पुणे - अजनी स्पेशल (२२ फेऱ्या) रेल्वे नं. ०११८९ विशेष रेल्वे पुणे येथून ५ एप्रिल ते १४ जून दरम्यान दर बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाचच्या सुमारास अजनी येथे पोहोचेल. तर रेल्वे नं. ०११९० विशेष रेल्वे ६ एप्रिल ते १५ जून या दरम्यान दर गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अजनी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. ही रेल्वे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेचे बुकिंग ३१ मार्च पासून सुरू होईल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.
विभाग