मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड आहोत का?; माजी सैनिकाच्या मुलाचा पडळकरांना सवाल

Pune : आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड आहोत का?; माजी सैनिकाच्या मुलाचा पडळकरांना सवाल

Mar 30, 2023, 10:29 AM IST

  •  gopichand padalkar: गोपीचंद पदळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, असे पडळकर म्हणाले होते. यावर एका माजी सैनिकांच्या मुलाने पडळकर यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे.

Pune News

gopichand padalkar: गोपीचंद पदळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, असे पडळकर म्हणाले होते. यावर एका माजी सैनिकांच्या मुलाने पडळकर यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे.

  •  gopichand padalkar: गोपीचंद पदळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, असे पडळकर म्हणाले होते. यावर एका माजी सैनिकांच्या मुलाने पडळकर यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे.

पुणे : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी टिका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवरून वादंग झाले होते. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने देखील पडळकर यांचा समाचार घेतला होता. दरम्यान, एका माजी सैनिकाच्या मुलानेदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या विरोधात त्याने पुण्यात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचा मुलगा माधव उर्फ नितीन सूर्यकांत याने हे बॅनर पुण्यात लावले असून त्यात पडळकर यांचा निषेध त्याने केला आहे. या बॅनरमधून त्यांनी पडळकर यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. असे लिहीत माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, असे त्यांनी बॅनरवर लिहिले आहे.

दरम्यान पुण्यात लागलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून पडळकर यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत त्यांचावर टीका केली आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा... याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, असे मिटकरी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा