मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji nagar : छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटांत राडा, गाड्यांची जाळपोळ
Chhatrapati sambhaji nagar news
Chhatrapati sambhaji nagar news

Sambhaji nagar : छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटांत राडा, गाड्यांची जाळपोळ

30 March 2023, 10:10 ISTNinad Vijayrao Deshmukh

Chhatrapati sambhaji nagar news : देशात आज राम नवमी साजरी केली जात आहे. या निमित्त विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. मात्र, छत्रपती संभाजी नगर येथे दोन गटात राडा झाला असून पोलिसांची वाहने अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहेत.

Chhatrapati sambhaji nagar news : देशात सगळीकडे रामनवमीचा जल्लोष सुरू आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गैर प्रकार टाळण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे. असे असतांना देखील छत्रपती संभाजी नगर येथे मध्यरात्री राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली. यामुळे येथील वतावरून तणावपूर्ण झाले आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

 

किराडपुरा भागात राम मंदिर आहे. आज या ठिकाणी विविध कार्यक्रम असल्याने गैर प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता.  यावेळी दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दगडफेक झाली. या गोंधळात काही समाजकंटकांनी मंदीरासमोर उभे असलेली पोलिसांची व्हॅन पेटवून दिली.   ही घटना स्थानिकांना समजताच परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र दिवसभरात गैरप्रकार होऊ नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

विभाग