मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्यानं तरुणीची आत्महत्या, NDA तील जवानाविरोधात गुन्हा

Pune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्यानं तरुणीची आत्महत्या, NDA तील जवानाविरोधात गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 30, 2023 09:22 AM IST

Pune crime News : विवाहित असतांना देखील एका जवाणाने तरुणीला लग्नाचे आमिष देऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याने तिने आत्महत्या केली.

Crime
Crime

पुणे : एका लष्करी जवणाने विवाहित असतांना देखील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. यामुळे निराश झालेल्या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संवपवले. ही घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुरिंदर सिंग (वय ३५ रा. एनडीए क्वार्टर, खडकवासला) असे आरोपी जवणाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तरुणीच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुरिंदर सिंग विवाहित होता. तो लष्करात जवान असून त्याची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंग एनडीएच्या वसाहतीत राहायला आहे. उत्तमनगर भागातील २१ वर्षीय तरुणीची सिंग याच्याशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आमिष दाखविले. दरम्यान, तरुणीने त्याला विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली.

 

आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्याने तिला हा धक्का सहन झाला नाही. तरुणीने राहत्या घरात प्रसाधनगृहात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सिंग याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. चवरे तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग