मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis Health : देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द करत सक्तीच्या विश्रांतीवर

Devendra Fadnavis Health : देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द करत सक्तीच्या विश्रांतीवर

May 17, 2023, 10:16 AM IST

    • Devendra Fadnavis Health News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis Health Update (HT_PRINT)

Devendra Fadnavis Health News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

    • Devendra Fadnavis Health News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis Health Update : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारदौरे आणि सभांचा धडाका लावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील निवडणूक आणि राज्यातील प्रवासाचा ताण यामुळं फडणवीस हे आजारी पडले असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळं आता फडणवीस हे मुंबईतील सागर बंगल्यावर सक्तीच्या विश्रांतीवर असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मराठी भाषिक बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर आणि भालकी या भागांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई आणि पुण्यातील संघटनात्मक बैठकीलाही फडणवीस यांनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास करावा लागत असल्यामुळं फडणवीस यांची चांगलीच दगदग झाली. परिणामी त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यानंतर आता त्यांनी मुंबई तसेच पुण्यातील अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मुंबई आणि पुण्यातील भाजपाच्या बैठकीला नड्डा हजेरी लावणार आहे. नड्डा यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अनेक बैठकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळं आता मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा