मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Budget Session : अवकाळी पावसाचा मुद्दा विधानसभेत गाजला; DCM फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Budget Session : अवकाळी पावसाचा मुद्दा विधानसभेत गाजला; DCM फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Mar 08, 2023, 12:37 PM IST

    • Devendra Fadnavis In Vidhan Sabha : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली.
Devendra Fadnavis In Vidhan Sabha (HT)

Devendra Fadnavis In Vidhan Sabha : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली.

    • Devendra Fadnavis In Vidhan Sabha : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली.

Devendra Fadnavis On Unseasonal Rain In Vidhan Sabha : महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. कांदा, गहू, फळबागा आणि भाजीपाल्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असल्यानं शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली जात आहे. त्यानंतर आता आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टी आणि गारपीटीमुळं राज्यातील १३ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई आणि संत्रा या पिकांचं नुकसान झाल्यामुळं आम्ही नुकसानग्रस्त भागांची माहिती मागवली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळं विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचं विधानसभेत बोलताना सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका- फडणवीस

राज्यातील अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांना विधानसभेत सरकारला धारेवर धरत जोरदार गोंधळ घातला. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारनं कोणत्याही अटी अथवा निकष न लावता शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर विरोधकांना प्रत्युत्तर देताना, हा शेतकऱ्यांचा विषय आहे, यात राजकारण करू नका. आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका घेत आहोत, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.