मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Dhangekar : कसब्यात भाजपने पोलिसांसोबत पैसे वाटले, धंगेकरांचा मोठा आरोप; आज उपोषणाला बसणार

Ravindra Dhangekar : कसब्यात भाजपने पोलिसांसोबत पैसे वाटले, धंगेकरांचा मोठा आरोप; आज उपोषणाला बसणार

Feb 25, 2023, 06:49 AM IST

    • Ravindra Dhangekar : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. यानंतर आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. यावरुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला असून या विरोधात ते आज उपोषण करणार आहेत.
Ravindra Dhangekar Pune (HT)

Ravindra Dhangekar : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. यानंतर आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. यावरुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला असून या विरोधात ते आज उपोषण करणार आहेत.

    • Ravindra Dhangekar : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. यानंतर आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. यावरुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला असून या विरोधात ते आज उपोषण करणार आहेत.

पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महावीकस आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला बसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

भारतीय जनता पक्षाने काल पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. कसबा मतदार संघातील रविवार पेठ, गंज पेठ या सारख्या आदी भागात भाजपने पैशांचे वाटप सुरू केले असून या संपूर्ण प्रकारात पोलिस देखील सहभागी असल्याचे धंगेकर यांचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी धंगेकर हे आज सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला बसणार आहेत. या निवडणुकीत ''लोकशाहीची हत्या झाली आहे, त्यामुळे उद्या उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम काल शांत झाली. तब्बल दोन आठवड्यापासून दोन्ही मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते पुण्यात तळ ठोकून होते. या काळात अनेक आरोप प्रत्यारोप करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) चिंचवडमध्ये १४ लाख तर कसब्यात २८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यात धंगेकर यांनी पैशे वाटपाचे आरोप केल्याने आता पुण्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा