मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Arvind Kejriwal : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली; केजरीवालांनी 'मातोश्री'हून डागली तोफ

Arvind Kejriwal : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली; केजरीवालांनी 'मातोश्री'हून डागली तोफ

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2023 09:26 PM IST

Arvind Kejriwal met Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेची चोरी झाली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Arvind Kejriwal - Uddhav Thackeray
Arvind Kejriwal - Uddhav Thackeray

Arvind Kejriwal on Shiv Sena Party and Symbol : मुंबई दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. खुद्द केजरीवाल यांनीच ही माहिती दिली. यावेळी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

शिवसेनेच्या संदर्भातील घडामोडींवर बोलताना केजरीवाल यांनी भाजप व शिंदे सेनेवर निशाणा साधला. 'मागच्या काही दिवसांत जे काही झालं ते पाहता मी हेच सांगू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झालीय. त्यांच्या पक्षाचं नाव चोरलं गेलं, चिन्ह चोरलं गेलं. त्यांच्याकडं जे काही होतं, ते चोरलं गेलं. पण उद्धव यांचे वडील वाघ होते आणि ते वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेलच, शिवाय येणाऱ्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे निर्विवाद जिंकतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंसोबत आपची युती होणार?

आगामी काळात आम आदमी पक्ष निवडणुका लढणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता केजरीवाल यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. निवडणुका येतील तेव्हा तुम्हाला सर्व काही कळेल, असं ते म्हणाले.

भेकड लोक यंत्रणांचा वापर करतात!

ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा वापर भेकड लोक करतात. त्यांना आमची भीती वाटते. म्हणूनच तर आमच्या घरी ईडी, सीबीआय येते. ही भीतीच आहे. त्यांना जे काय करायचं ते करू द्या. आम्ही तयार आहोत. जनता सगळं बघते आहे. शेवटी सत्याचा विजय होतो. खोटं हे खोटं असतं, सत्य हे सत्य असतं. विजय सत्याचाच होतो, असं केजरीवाल म्हणाले.

IPL_Entry_Point