मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी; सुसाईड रोखण्यासाठी शिंदे सरकारचा निर्णय

मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी; सुसाईड रोखण्यासाठी शिंदे सरकारचा निर्णय

Jul 19, 2022, 01:24 PM IST

    • Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.
Shinde Fadnavis Govt In Maharashtra (HT)

Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.

    • Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.

Shinde Fadnavis Govt In Maharashtra : राज्यात सरकार स्थापन होऊन १९ दिवस उलटलेले असताना अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं मंत्रालयातील अनेक कामं रेंगाळली असल्यानं लोकांची निराशा होत आहे. राज्यातील अनेक लोक त्यांची कामं घेऊन मंत्रालयात येत असतात. काम झालं नाही तर निराश होऊन मंत्रालयातच आत्महत्या करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. अशा घटनांना चाप लावण्यासाठी आता शिंदे सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश करताना नागरिकांच्या खिशात तंबाखू किंवा गुटख्याच्या पुड्या आहेत का, याची तपासणी केली जात होती. परंतु आता मंत्रालयात प्रवेश करत असताना नागरिकांनी पाण्याच्या बाटल्या आत न नेण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर आता गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे.

सरकारनं आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी अनेक नागरिक आपले गाऱ्हाणे मंत्रालयात घेऊन येत असतात. त्यावेळी त्यांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सध्या सर्वसामान्य लोकांना मंत्रालयात आकाशवाणीसमोरील गेटवरूनच प्रवेश देण्यात येत असून आत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गेट पास व ओळखपत्र नसल्याशिवाय कोणत्याही नागरिकाला प्रवेश देण्यात नाहीये. त्याचबरोबर आत जाणाऱ्या नागरिकांना पाण्याची बाटली आत घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये तारांबळ उडाली आहे.