मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टीची शक्यता कायम!

Rain : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टीची शक्यता कायम!

Jul 19, 2022, 08:40 AM IST

    • Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पूरस्थितीमुळं आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे.
Maharashtra Rain Live Updates (HT)

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पूरस्थितीमुळं आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे.

    • Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पूरस्थितीमुळं आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे.

Maharashtra Rain Live Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ धातलेला असून त्यामुळं राज्यातील अनेक नद्यांना पूर आला असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली भागात महापूर आला असून त्यामुळं हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांप्रमाणेच आज आणि उद्याही मुसळधार पावसाची शक्यता कायम असणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमरावतीत पेढी नदीला पूर...

अमरावती जिल्ह्यातील पेढी नदीला पूर आल्यानं संत गाडगेबाबा वृद्धांश्रमातील ३० वृद्धांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं त्याचा फटका अनेक गावांना बसला आहे. काल संध्याकाळी मेळघाट वगळता संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता.

बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर...

बुलडाणा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आला असून हजारो एकर शेतीतील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळं या दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून पूर्णा नदीत विसर्ग करण्यात आला होता.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती...

विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. सतत मुसळधार पाऊस पडत असल्यानं अनेक भागांमध्ये पूर आला असून त्यामुळं नद्यांचं पात्र ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाढच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. विदर्भात पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूरात दुपारच्या पावसानंतर संध्याकाळी पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं.

मराठवाड्यात संततधार…

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या