मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आम्हाला गुवाहाटीला फिरायला नेणार का?, चिमुकलीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री निरुत्तर

आम्हाला गुवाहाटीला फिरायला नेणार का?, चिमुकलीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री निरुत्तर

Jul 18, 2022, 06:42 PM IST

    • CM Eknath Shinde News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांच्या पाठिंब्यानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्याची आता देशभरात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आता त्यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
CM Eknath Shinde News (HT)

CM Eknath Shinde News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांच्या पाठिंब्यानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्याची आता देशभरात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आता त्यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    • CM Eknath Shinde News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांच्या पाठिंब्यानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्याची आता देशभरात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आता त्यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ४० आमदारांना वेगळं करत भाजपच्या पाठिंब्यावर राज्यातील सत्ता मिळवली. त्यांनी ज्या प्रकारे शिवसेना, राष्ट्र्वादी आणि कॉंग्रेसचं महाविकास आघाडी सरकार पाडलं त्याची चर्चा देशभरात होत आहे. तर मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे हे चांगलेच सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. वारकऱ्यांना टोलमाफी, मुंबईतील पूरस्थितीची पाहणी असेल किंवा दिल्ली दौरा, अशा अनेक गोष्टींमुळं एकनाथ शिंदे यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

परंतु त्यांचं नातवावर किती प्रेम आहे हे त्यांनी त्यांच्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात दाखवून दिलं होतं. काल त्यांचा नातू आजारी असल्यानं त्यांनी जवळपास चार तास रुग्णालयात घालवले होते. परंतु आता त्यांचा एका चिमुकलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात चिमुकलीनं शिंदेंना चक्क गुवाहाटीला फिरायला नेण्याची मागणी केल्यानं उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला. शिंदेचा चिमुकलीसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेयर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कूलमध्ये शिकणाऱ्या अन्नदा डामरे या चिमुकलीनं मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या घरी भेट घेतली आहे. त्यावेळी अन्नदानं शिंदेंना विचारलं की 'तुम्ही पाण्यात जाऊन पूरग्रस्तांची मदत केली, मी पण लोकांना मदत केली आहे, त्यामुळं आता मला मुख्यमंत्री होता येईल का?', यावर शिंदेंनी चिमुकलीच्या खांद्यावर हात ठेवत 'हो, होशील की', असं उत्तर दिलं.

त्यानंतर अन्नदा पुन्हा म्हणाली की 'याआधी मला मोदीजी आवडायचे. पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडू लागला आहात. पण आता तुम्ही आता रुद्रांशला वेळ कसा देणार?' असा प्रश्न तिनं शिंदेंना विचारला. त्यावर शिंदेंनी उत्तर देताना 'मी त्याला भेटायला ठाण्याला जाणार होतो, पण तोच मला भेटायला इकडे आला', असं उत्तर शिंदेंनी दिलं.

शेवटी जाताना अन्नदानं शिंदेंकडं गुवाहाटीला फिरायला नेण्याची मागणी केली, हे ऐकताच उपस्थित सर्वच लोक हसायला लागले. शिंदेंनाही काय बोलावं हे कळेना. यावर त्यांनी केवळ होकार्थी मान हलवत प्रतिक्रिया दिली. 'तुला कामाख्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायचं ना?', असं शिंदेंनी विचारल्यानंतर अन्नदानंही होकार दिला, शेवटी फार हुशार आहेस असं म्हणत शिंदे अन्नदाचा गाल ओढून निघून गेले.

पुढील बातम्या