मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : हिंदुत्वाचा कांगावा करणारे पुण्यातील प्रकरणावर गप्प का?, आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल

Pune : हिंदुत्वाचा कांगावा करणारे पुण्यातील प्रकरणावर गप्प का?, आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल

Sep 25, 2022, 12:53 PM IST

    • BJP vs Shiv Sena : पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यावरून आता भाजपनं शिवसेनेवर टीका केली आहे.
Ashish Shelar vs Uddhav Thackeray (HT PHOTO)

BJP vs Shiv Sena : पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यावरून आता भाजपनं शिवसेनेवर टीका केली आहे.

    • BJP vs Shiv Sena : पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यावरून आता भाजपनं शिवसेनेवर टीका केली आहे.

Ashish Shelar vs Uddhav Thackeray : ईडी आणि एनआयएनं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी केली आहे. त्यात पीएफआयच्या १०० हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या संघटनेवर दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचा आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. परंतु काल पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात या कारवाईविरोधात आंदोलन केलं होतं. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं आता या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

आशिष शेलारांनी ट्विट करून ठाकरे या प्रकरणावर गप्प का आहेत, असा सवाल करत टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, इतिहासातील खानांची सदैव उचकी लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले आणि संकटं टळून गेल्यावर करुन दाखवलेचे होर्डिंग लावणारे आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत, आता कुठल्या बिळात बसला आहात? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

पीएफआयचा देशविरोधी कट उघड, पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या आणि सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेनेत राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

घोषणांच्या वृत्ताचं पोलिसांकडून खंडन...

पुण्यातील या प्रकरणानंतर बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात फेक बातम्या पसरवण्यात आल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आंदोलक हे पीएफआय जिंदाबाद आणि पॉप्यूलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा देत होते, तिथं पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे. याशिवाय काही वाहिन्यांची या आंदोलनाबाबत चुकीच्या बातम्या चालवल्याचंही पोलिसांनी सांगितलं.