मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पचन क्रिया सुधारण्यासाठी प्रभावी आहे हे आसन, पाहा करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: पचन क्रिया सुधारण्यासाठी प्रभावी आहे हे आसन, पाहा करण्याची योग्य पद्धत

Mar 13, 2023, 08:21 AM IST

    • तुम्हाला सुद्धा पचनाची समस्या असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर वज्रासन करु शकता. जाणून घ्या हे आसन करण्यासाठी योग्य पद्धत.
वज्रासन (HT)

तुम्हाला सुद्धा पचनाची समस्या असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर वज्रासन करु शकता. जाणून घ्या हे आसन करण्यासाठी योग्य पद्धत.

    • तुम्हाला सुद्धा पचनाची समस्या असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर वज्रासन करु शकता. जाणून घ्या हे आसन करण्यासाठी योग्य पद्धत.

Yoga To Improve Digestive System: योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे सर्व आजार बरे होतात. तर शरीर लवचिक होऊन चरबी नाहीशी होते. पाठदुखी असो की गुडघेदुखी, योगासने त्या सर्व दूर करतात. यासोबतच काही योगासनांमुळे पचनक्रिया सुधारते. जे अन्न पचण्यास मदत करते. योग असो किंवा व्यायाम, हे सर्व जेवणापूर्वी सुमारे ४ -५ तासांनी केले पाहिजे. पण एक योगासन आहे जे जेवणानंतर केल्यास जास्त फायदा होतो. वास्तविक वज्रासन हे पाचन तंत्राच्या योग्य कार्यासाठी केले जाते. जेवणानंतर हे आसन केल्याने अधिक फायदा होतो.

ट्रेंडिंग न्यूज

Joke of the day : जेवताना मध्ये बोलणाऱ्या चिंटूला पप्पांनी थांबवलं आणि पुढे घोटाळाच झाला!

Summer Heat Wave: कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या शरीरातील उष्णतेपासून कशी मिळेल सुटका

Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम

Onion Paratha Recipe: रेगुलर बटाट्याऐवजी आज नाश्त्यात बनवा कांद्याचा पराठा, जाणून घ्या रेसिपी!

कसे करावे वज्रासन

वज्रासन करणे खूप सोपे आहे आणि कोणीही करू शकतो. हे आसन जेवणानंतर लगेच योगा मॅटवर किंवा पलंगावर बसूनही करता येते. कुटुंबासोबत गप्पागोष्टी करतानाही तुम्ही हे आसन आरामात करू शकता. वज्रासन करण्यासाठी गुडघे वाकवून पाय मागे सरकवा. आता पायाच्या तळव्यावर नितंब ठेवा आणि खाली बसा. आता कंबर, पाठ, मान एकदम सरळ ठेवा. दोन्ही गुडघ्यांवर हात आरामात ठेवा. डोळे बंद करा आणि सरळ श्वास घ्या. हे आसन सुरुवातीला २ मिनिटांनी सुरू करा. नंतर कालांतराने आपण ते सुमारे १५ मिनिटे करू शकता.

वज्रासनाचे फायदे

- वज्रासन केल्याने शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित काम करू लागते.

- हे आसन शरीरातील अन्न पचवणाऱ्या एन्झाइम्सना प्रोत्साहन देते.

- ज्या लोकांना अपचन, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ, गॅसची समस्या आहे, या आसनामुळे त्यांना आराम मिळतो.

- वज्रासनामुळे कंबर आणि पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते.

- तसेच पायांचे स्नायू मजबूत होतात.

- सतत बसून काम करणाऱ्यांची मुद्रा अनेकदा बिघडते. अशा स्थितीत वज्रासन केल्याने त्यांची मुद्रा सुधारण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग