Yoga Mantra: वाढत्या वजनाची काळजी सोडा, कंट्रोल करण्यासाठी मदत करतील हे योगासन
एकदा वजन वाढले की ते कमी करणे कठीण असते. त्यामुळे वाढलेल्या वजनाची काळजी करण्यापेक्षा हे योगासन करा. तुमचे वजन कमी करण्यासाठी ते मदत करतील.
Yoga Poses for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. त्यातील एक म्हणजे योगासन. अहवालांनुसार योगामुळे अनेकांना निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यात मदत झाली आहे. वजन कमी करण्यासाठी योग हा चर्चेचा विषय राहिला आहे. रिपोर्ट्सनुसार फक्त योगा केल्याने वजन कमी होत नाही. योगासने, सकस आहारासोबत जोडल्यास ते फायदेशीर ठरते. कारण ते तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासह वजन कमी करण्यास मदत करते. योगामुळे तुमचे मन बळकट होते. वजन कमी करण्याच्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, पहिला म्हणजे निरोगी आहार आणि दुसरे व्यायाम.
ट्रेंडिंग न्यूज
वजन कमी करण्यासाठी करा हे आसन
विरभद्रासन
तुम्हाला तुमच्या मांड्या आणि खांदे टोन करायचे असतील तर हे आसन करा. विरभद्रासन केल्यावर काही मिनिटांनंतर तुम्हाला टाइट क्वाड मिळेल. हे योगासन तुमच्या पाठीचे एंड, पाय आणि हातांच्या टोनिंगसह तुमचे संतुलन सुधारते. हे तुमचे पोट टोन करण्यास देखील मदत करते आणि स्थिती राखून ठेवत तुम्ही पोटाचे स्नायू आकुंचन पावल्यास तुमचे पोट सपाट होते.
त्रिकोनासन
त्रिकोनासनामुळे पचनक्रिया सुधारण्यासह पोटात आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते. हे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढवते. हे आसन केल्याने, कंबरेवरील चरबी जाळण्यास, मांड्या आणि हॅमस्ट्रिंगमध्ये अधिक स्नायू तयार करण्यास मदत होते.
सेतू बंध सर्वांगासन
हे आसन ग्लूट्स, थायरॉईड तसेच वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहे. सेतू बंध सर्वांगासन स्नायू टोन, पचन सुधारते, हार्मोन्स नियंत्रित करते आणि थायरॉईड पातळी सुधारते. हे तुमच्या पाठीचे स्नायू देखील मजबूत करते आणि पाठदुखी कमी करते.
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार स्नायूंना वॉर्म करुन ब्लड फ्लो करण्यासोबतच ते बहुतेक प्रमुख स्नायूंना ताणते आणि टोन करते. कंबर कमी करते, हात टोन करते, पचनसंस्था उत्तेजित करते आणि चयापचय संतुलित करते. सूर्यनमस्कार हे उत्तम आरोग्याचे संपूर्ण पॅकेज आणि वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग