मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Heat Wave: कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या शरीरातील उष्णतेपासून कशी मिळेल सुटका

Summer Heat Wave: कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या शरीरातील उष्णतेपासून कशी मिळेल सुटका

May 02, 2024, 02:49 PM IST

    • Heat Wave Precaution: उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कडक उन्हातून घरी आल्यानंतर या गोष्टी करू नका.
Summer Heat Wave: कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या शरीरातील उष्णतेपासून कशी मिळेल सुटका (unsplash)

Heat Wave Precaution: उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कडक उन्हातून घरी आल्यानंतर या गोष्टी करू नका.

    • Heat Wave Precaution: उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कडक उन्हातून घरी आल्यानंतर या गोष्टी करू नका.

Heat Wave Safety Tips: उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानाबरोबर उष्ण वाऱ्यांमुळे हवामान आणखी गरम होत आहे. अशा स्थितीत घराबाहेर पडणे कठीण होऊन बसते. मात्र कामासाठी उन्हात बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रखर उन्हाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि उष्णतेच्या लाटेमुळे तुम्ही बेशुद्ध होणार नाही. अनेकदा लोक कडक उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये पोहोचताच काही चुका करतात. त्यामुळे ताप येणे, चक्कर येणे अशा समस्या सुरू होतात. कडक उन्हातून घरी आल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

लगेच एसीमध्ये जाऊ नका

जास्त वेळ उन्हात राहिल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी पोहोचता तेव्हा लगेच एसीमध्ये अजिबात जाऊ नका. त्यापेक्षा काही वेळ फक्त पंख्याची हवा घ्या. जेणेकरून एकदा शरीराचे तापमान सामान्य होऊन घाम सुकतो. त्यानंतरच एसी किंवा कुलरमध्ये जा.

लगेच कपडे बदलू नका

कडक उन्हातून घरी परतल्यावर लगेच कपडे बदलून अंघोळ करण्याची चूक करू नका. त्यापेक्षा पाच ते दहा मिनिटे कपडे सैल सोडून हवेत श्वास घ्या. मग कपडे बदला.

लगेच आंघोळ करू नका

तसेच घरी परतल्यावर लगेच आंघोळ करण्याची चूकही करू नका. यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो. कडक उन्हामुळे थेट थंड पाणी अंगावर टाकल्यास स्नायूंमध्ये जडपणा येऊ शकतो.

लगेच थंड पाणी पिऊ नका

कडक उन्हातून घरी परत आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. कडक उन्हामुळे घसा कोरडा होऊ शकतो. पण घरी परतताच थंड पाणी पिऊ नका. शरीराचे तापमान सामान्य झाल्यानंतरच सामान्य तापमानात ठेवलेले पाणी प्या.

हलके कपडे घाला

घरी आल्यानंतर हलके, सुती आणि श्वास घेण्यासारखे कपडे घाला. जेणेकरून शरीराला हवा मिळेल आणि थंडावा जाणवेल.

विश्रांती घ्या

ऊन आणि उष्णतेमुळे शरीर पूर्णपणे थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे थकवा दूर करून काही काळ विश्रांती घ्या. त्यानंतरच मेहनतीचे काम करायला सुरु करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या