Ways to Add Lemon in Diet for Weight Loss: जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात लिंबाचा अवश्य समावेश करा. नॅशनल लायब्ररीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार लिंबूमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. रोजच्या रुटीनमध्ये त्याचा समावेश केल्यास वजन कमी करणे सोपे होते. यात अत्यावश्यक पोषक घटक देखील उपलब्ध आहेत. लिंबू फक्त तुमचे वजन कमी करत नाही तर हे शरीराचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ कमी करण्यासोबतच पचन सुधारण्यास मदत करते. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी लिंबूचा आहारात कोणत्या पद्धतीने समावेश करावा.
लिंबू फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडेंटने समृद्ध असते. त्यामुळे रोजच्या आहारात याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्हिटॅमिन सी शरीरातील चरबी जलद वितळण्यास मदत करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ यामुळे वजन वाढते. लिंबूतील अँटीऑक्सिडंट्स हे काढून टाकण्यास मदत करतात. या मार्गांनी लिंबाचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
तुमच्या मॉर्निंग ड्रिंकमध्ये लिंबाचा समावेश करा. त्यामुळे वजन कमी होण्यासोबतच बॉडी डिटॉक्सही होतो.
पाण्यात लिंबाचा रस आणि काकडी मिक्स करून प्यायल्याने ते चवीला चांगले नाही तर शरीराला हायड्रेट करण्यास देखील मदत करते. काकडीत खूप कमी कॅलरीज आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तुम्ही काकडी खाल्ल्यास दिवसभर हायड्रेशन राखण्यास मदत होते. व्हिटॅमिन के, सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील उपलब्ध आहेत. हे आरोग्यासाठी चांगले असते.
दररोज सकाळी काही ताज्या पुदिन्याच्या पानांमध्ये लिंबू पाणी मिसळून पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे लिव्हर डिटॉक्स तसेच पोट थंड ठेवण्यास मदत करतात. पुदिना आणि लिंबू पचन सुधारतात. चयापचय देखील वाढतो आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.
आल्याचा रस पुदिना आणि लिंबाच्या रसात मिसळून ड्रिंक बनवा आणि ते प्या. त्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करणे सोपे होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या