मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cucumber Peel Benefits: बद्धकोष्ठतेपासून वेट लॉस पर्यंत, साल न काढता काकडी खाण्याचे हे आहेत फायदे

Cucumber Peel Benefits: बद्धकोष्ठतेपासून वेट लॉस पर्यंत, साल न काढता काकडी खाण्याचे हे आहेत फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 29, 2024 08:06 PM IST

Cucumber Peel Benefits: लोक सलादपासून रायता बनवण्यापर्यंत विविध प्रकारे काकडीचे सेवन करतात. पण हे करत असताना अनेकदा लोक काकडीची साले निरुपयोगी समजून फेकून देतात. जर तुम्हीही आत्तापर्यंत अशा चुका करत असाल तर आधी त्याचे फायदे जाणून घ्या.

Cucumber Peel Benefits: बद्धकोष्ठतेपासून वेट लॉस पर्यंत, साल न काढता काकडी खाण्याचे हे आहेत फायदे
Cucumber Peel Benefits: बद्धकोष्ठतेपासून वेट लॉस पर्यंत, साल न काढता काकडी खाण्याचे हे आहेत फायदे (unsplash)

Health Benefits of Eating Cucumber With Peel: उन्हाळ्यात लोकांना त्यांच्या आहारात चविष्ट पदार्थांचा समावेश करायला आवडते. जे त्यांचे शरीर थंड ठेवण्यास आणि हायड्रेशन राखण्यास मदत करते. असेच एक उन्हाळ्याचे फूड म्हणजे काकडी. काकडीत प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळेच लोक सलादपासून रायता बनवण्यापर्यंत प्रत्येक विविध प्रकारे काकडीचे सेवन करतात. पण हे करत असताना अनेकदा लोक काकडीची साले निरुपयोगी समजून फेकून देतात. आत्तापर्यंत अशा चुका करत असाल तर पुढच्या वेळी करू नका. चला जाणून घेऊया काकडी सालीसकट खाण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर नेहमी काकडीची साल न काढता सेवन करा. काकडीच्या सालीमध्ये असलेले बीटा- कॅरोटीन आणि अघुलनशील फायबर बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर आतड्याची हालचाल वेगवान होऊन पोट साफ होण्यासही मदत होते.

वजन कमी करण्यात प्रभावी

जर तुम्ही वजन कमी करण्याचा आणखी चांगला मार्ग शोधत असाल तर काकडीच्या सालासह सेवन करा. सालासह काकडीचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि लालसा नियंत्रित राहते. भरपूर फायबर आणि रफेज असलेल्या काकडीची साले खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

स्किन एजिंग नियंत्रित करते

काकडीच्या सालीमध्ये एस्कॉर्बिक ॲसिड आढळते जे एजिंग नियंत्रित करते आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. इतकंच नाही तर सालासह काकडी खाल्ल्याने कोलेजन उत्पादनाला गती मिळते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

काकडीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. जर तुम्हाला निरोगी दृष्टी हवी असेल तर काकडीचे साल न काढता ते तुमच्या आहारात समाविष्ट करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel