मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raw Mango Benefits: आरोग्यासाठी अनेक फायदे देते कैरी, रोजच्या आहारात समावेश करायला विसरू नका

Raw Mango Benefits: आरोग्यासाठी अनेक फायदे देते कैरी, रोजच्या आहारात समावेश करायला विसरू नका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 26, 2024 06:37 PM IST

Summer Health Tips: जर तुम्ही कैरी आंबटपणामुळे खात नसाल तर जाणून घ्या उन्हाळ्यात मिळणारी कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पाहा कैरी खाण्याचे फायदे.

Raw Mango Benefits: आरोग्यासाठी अनेक फायदे देते कैरी, रोजच्या आहारात समावेश करायला विसरू नका
Raw Mango Benefits: आरोग्यासाठी अनेक फायदे देते कैरी, रोजच्या आहारात समावेश करायला विसरू नका (freepik)

Health Benefits of Raw Mango: उन्हाळा सुरू होताच कैरी उपलब्ध होऊ लागते. लोक कैरीपासून विविध पदार्थ बनवतात. लोकांना कैरीपासून बनणारे चटणी, लोणची, मुरब्बा, पन्हं या सर्व गोष्टी आवडतात. एवढंच नाही तर काही जण कैरी तसंच मीठासोबत देखील खातात. पण असे काही लोक आहेत ज्यांना कैरी फारशी आवडत नाही. तुम्हालाही कैरीच्या आंबटपणामुळे ती खायला नको वाटत असेल तर आधी जाणून घ्या ती आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. कैरीचे आरोग्यदायी फायदे येथे पाहा.

ट्रेंडिंग न्यूज

प्रत्येक प्रकारच्या डिशची चव वाढवते

कैरीचा आंबटपणा प्रत्येक प्रकारच्या डिशची चव वाढवतो. ते फक्त लोणची आणि चटण्यांमध्येच वापरले जात नाही तर त्याच्या आंबट चवसाठी देखील वापरला जाते. कैरीची गोड आणि आंबट चव गूळ किंवा साखर मिसळून वापरल्यास कोणताही कंटाळवाणा पदार्थ चवदार बनतो.

उष्माघातापासून बचाव करते

कैरी विस्तवावर भाजून खाल्ल्यास उष्माघातापासून बचाव होतो. कैरीमध्ये थंड प्रभाव असतो जो शरीराला उष्णतेपासून वाचवतो. कैरीपासून बनवलेले पन्हं प्यायल्याने उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, मूर्च्छा, उलट्या यासारख्या समस्या दूर होतात.

ओरल हेल्थसाठी फायदेशीर

आंबट कैरी खाल्ल्यास ओरल हेल्थ सुधारते. कैरीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात. तसेच दातांच्या समस्यांपासून बचाव होतो.

वजन कमी करण्यास मदत

कैरीपासून बनवलेले पेय प्यायल्यास उन्हाळ्यात होणारी अस्वस्थता आणि तहान दूर होते. याशिवाय त्यात कमी कॅलरीज आणि फायबर असतात. जे जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. कैरीमध्ये असलेले फायबर भूक कमी करण्यास आणि तृप्त वाटण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. याशिवाय शरीराला व्हिटॅमिन ए आणि ई देखील मिळते. बीटा कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कैरी रोज खाल्ल्यास मौसमी आजारांपासून संरक्षण होते आणि संसर्गापासून बचाव होतो

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते

उन्हाळ्यात ऊन आणि जास्त उष्णता यामुळेही शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे अस्वस्थता, बेशुद्धी यासारख्या समस्या उद्भवू लागतात. कैरी शरीराला थंड ठेवण्यास आणि तापमान राखण्यास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel