Side Effects of Reheating Cooking Oil: पकोडे आणि पापड तळून झाल्यावर कढईत उरलेले तेल तुम्ही नंतर भाजी करण्यासाठी पुन्हा वापरत असाल तर सावध व्हा. नकळत तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या कुटुंबाची मोठी हानी करत आहात. बरेचदा उरलेले कुकिंग ऑइल घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की कुकिंग ऑइल वारंवार वापरल्याने किंवा ते पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात, ज्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्सची समस्या वाढू शकते. यामुळे भविष्यात शरीरात सूज, लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे अनेक घातक आजार होऊ शकतात. वापरलेल्या कुकिंग ऑइलचा पुन्हा वापर केल्याने तुमच्या आरोग्याला हळूहळू कसे हानी पोहोचते ते जाणून घ्या.
उरलेले तेल वापरल्याने व्यक्तीला अल्सर, ॲसिडिटी, जळजळ यासारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पचनावर विपरित परिणाम होतो आणि अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ लागतात.
आजकाल बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. उरलेले तेल पुन्हा वापरल्याने तुमची लठ्ठपणाची समस्या आणखी वाढू शकते. किंबहुना शिजवलेल्या तेलात पुन्हा शिजवलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात ट्रान्स फॅट म्हणजेच अनहेल्दी फॅटचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागते. अशा परिस्थितीत वापरलेले तेल शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर उरलेले तेल वापरणे टाळा. तेल वारंवार गरम केल्याने मुक्त फॅटी अॅसिडस् आणि रॅडिकल्स बाहेर पडतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर त्वरीत अनियंत्रित होऊ शकतो.
गरम केलेल्या तेलात शिजवलेले अन्न वारंवार खाल्ल्याने आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटात आणि घशात जळजळ जाणवते. जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त अॅसिडिटी जाणवत असेल तर जंक आणि डीप फ्राय केलेले पदार्थ सोबतच उरलेल्या तेलात स्वयंपाक करणे टाळा.
जर तुम्ही तेल पुन्हा-पुन्हा गरम करत असाल तर अशा प्रकारच्या तेलाचा वापर केल्यास पोटात गॅस आणि जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
उरलेल्या तेलात शिजवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील सूज वाढते. त्यामुळे शरीरात वेदना, सूज येणे आणि ॲसिडिटीच्या समस्या वाढल्या आहेत. याशिवाय वाढत्या वयाबरोबर शरीरात अल्झायमरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या