Seeds for Health: निरोगी राहायचे असेल तर आहारात नक्की करा या सीड्सचा समावेश, चुकवू नका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Seeds for Health: निरोगी राहायचे असेल तर आहारात नक्की करा या सीड्सचा समावेश, चुकवू नका

Seeds for Health: निरोगी राहायचे असेल तर आहारात नक्की करा या सीड्सचा समावेश, चुकवू नका

Apr 22, 2024 08:17 PM IST

Health Care Tips: शरीराला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ अनहेल्दी फूड खाणे थांबवणे पुरेसे नाही तर त्याच्या बदल्यात हेल्दी फूड खाणे देखील महत्त्वाचे आहे. या सीड्स आरोग्यासाठी उत्तम असतात.

Seeds for Health: निरोगी राहायचे असेल तर आहारात नक्की करा या सीड्सचा समावेश, चुकवू नका
Seeds for Health: निरोगी राहायचे असेल तर आहारात नक्की करा या सीड्सचा समावेश, चुकवू नका (unsplash)

Seeds for Good Health: जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर फक्त जंक फूड आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहणे पुरेसे नाही. यासोबतच शरीराला सर्व प्रकारची पोषक आणि नॅचरल फॅट मिळत राहणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून रोग शरीरावर आक्रमण करू शकत नाहीत. या लहान बिया शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यात अप्रतिम भूमिका बजावतात. आपल्या सोयीनुसार आहारात यांचा समावेश करावा. त्या सीड्स कोणत्या आहेत ते जाणून घ्या

जवसाच्या बिया

जवसाच्या बिया म्हणजे फ्लेक्स सीड्स या लहान तपकिरी बिया महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. प्राचीन काळापासून बाळाच्या जन्मानंतर ते स्त्रियांना दिले जाते. परंतु जवसाच्या बिया फक्त मातांसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकतात. या बिया खाल्ल्याने शरीराला ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळते. जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि कोलेस्टेरॉलसाठी खूप महत्वाचे आहे. तसेच दररोज दोन चमचे जवसाच्या बिया खाल्ल्याने ६ ग्रॅम फायबर आणि ४ ग्रॅम प्रथिने मिळतात. फ्लेक्स सीड्स केवळ आरोग्याचेच रक्षण करत नाहीत तर त्वचा आणि केसांचेही संरक्षण करतात. त्यामुळे रोज सकाळी फक्त दोन चमचे बिया खाल्ल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

चिया सीड्स

चिया सीड्स रात्रभर भिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. पण फार कमी लोकांना त्याची जेल सारखी फॉर्मेशन आवडते. चिया सीड्सचे फायदे जाणून घेतल्यानंतर ते खाण्यास कोणीही मागे पुढे विचार करणार नाही. दोन चमचे चिया सीड्समध्ये १० ग्रॅम फायबर असते. त्यात प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडेंट, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक देखील असतात. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. यातून शरीराला अनेक आवश्यक पोषक घटक मिळतात.

सूर्यफुलाच्या बिया

लोकांना सूर्यफुलाच्या बिया नट आणि ड्रायफ्रुट्ससोबत खायला आवडतात. प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील चांगले असते. जे हृदयाच्या आरोग्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि गर्भवती महिलांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया महिलांसोबतच पुरुषांसाठीही वरदानापेक्षा कमी नाहीत. भोपळ्याच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण दैनंदिन गरजेच्या १६ टक्के असते. यासोबतच अमिनो ॲसिड, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, झिंक आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे उपलब्ध आहेत. भोपळ्याच्या बिया रोज खाल्ल्याने वजन नियंत्रित करणे सोपे होते.

सब्जा

सब्जा सीड्सना बेसिल सीड्स असेही म्हणतात. प्रथिने, इसेंशियल फॅट, कार्ब्स आणि फायबर भरपूर असूनही, त्यात झीरो कॅलरीज आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सब्जा खूप फायदेशीर आहे. यासोबतच सब्जाच्या बिया आतड्यांचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

तीळ

हे छोटे बिया गुणांचे भांडार आहेत. काळे तीळ किंवा पांढरे तीळ दोन्ही खूप फायदेशीर आहेत. ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी ठेवण्यास मदत करतात. हाडे मजबूत करणे, जळजळ कमी करणे याशिवाय ते प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner