Body Detoxification: शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नसल्याचे सांगतात ही चिन्हं, दिसतात ही लक्षणं
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Detoxification: शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नसल्याचे सांगतात ही चिन्हं, दिसतात ही लक्षणं

Body Detoxification: शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नसल्याचे सांगतात ही चिन्हं, दिसतात ही लक्षणं

Apr 23, 2024 03:54 PM IST

Body Detox: शरीरातील अवयव जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकतात. पण जेव्हा ही लक्षणे शरीरात दिसू लागतात तेव्हा समजून घ्या की शरीराचे डिटॉक्स फंक्शन नीट काम करत नाहीये.

Body Detoxification: शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नसल्याचे सांगतात ही चिन्हं, दिसतात ही लक्षणं
Body Detoxification: शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नसल्याचे सांगतात ही चिन्हं, दिसतात ही लक्षणं

Signs That Body Need Detox: शरीरातून दररोज भरपूर विषारी पदार्थ बाहेर पडतात. आपण जेंव्हा जेंव्हा खातो किंवा पितो तेंव्हा शरीर त्यातून आवश्यक पोषक तत्वे शोषून घेते. उर्वरित निरुपयोगी आणि अनावश्यक घटक काढून टाकते. परंतु जेव्हा हे अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते विषारी बनतात आणि शरीरात रोग निर्माण करू लागतात. तुमचे शरीर पूर्णपणे डिटॉक्स होत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर या लक्षणांकडे लक्ष द्या. जे टेस्ट न करताही शरीरात टॉक्सिन्सचं प्रमाण वाढत असल्याचं सांगतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

बद्धकोष्ठतेची समस्या

दैनंदिन कामात शौचास न गेल्यास आणि शौच करण्याची इच्छा नसल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. म्हणजे शरीरात विषारी पदार्थ जमा होत आहेत. बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढतात.

घामाचा अभाव

घामाच्या मदतीने शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर काढले जातात. पण जेव्हा तुम्हाला कमी घाम येतो किंवा कमी शारीरिक श्रमामुळे घाम येत नाही, तेव्हा शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू लागते.

एक्ने

त्वचेवर पुरळ जास्त असल्यास ही लक्षणे शरीरात विषारी द्रव्ये जमा होण्याचे लक्षण आहेत. अनेकदा एक्ने केवळ चेहऱ्यावरच नाही तर पाठीवर, हातावर आणि हिपवर सुद्धा होतात. जे शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची लक्षणे आहेत. याशिवाय रॅशेस आणि एलर्जीच्या त्वचेच्या समस्या, विषारी पदार्थ असल्याचे दर्शवतात.

दिवसभर थकवा जाणवणे

शारीरिक श्रम न करताही दिवसभर थकवा जाणवत असेल तर हे शरीरात विषारी द्रव्ये जमा होण्याची लक्षणे असू शकतात.

वजन सहजासहजी कमी होत नाही

जर शरीराचे वजन जास्त असेल आणि वजन कमी करणे कठीण असेल. तर याचे एक कारण म्हणजे शरीरातील विष. विशेषत: बेली फॅटचे कारण बद्धकोष्ठता आणि पोटावर जमा झालेली चरबी असते. जे बेली फॅटच्या रूपात दिसते.

या कारणांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात

- जेव्हा तुम्ही योग्य आहार घेत नाही, अनहेल्दी आणि जंक फूडमुळे शरीरात विषारी पदार्थ झपाट्याने जमा होतात.

- तणावामुळे शरीरातील अवयव नीट काम करत नाहीत आणि शरीर स्वतःला डिटॉक्स करू शकत नाही.

- शारीरिक काम किंवा व्यायामाचा अभाव हे शरीरातील विषारी पदार्थांचे मुख्य कारण आहे. घाम येत नाही. पुरळ येत. बद्धकोष्ठतेची समस्या शारीरिक व्यायामाने सहज सुटू शकते.

- प्रदूषित वातावरण - सभोवतालच्या वातावरणात जास्त प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner