मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gallbladder Stone: कशामुळे होतात पित्ताशयातील स्टोन? जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

Gallbladder Stone: कशामुळे होतात पित्ताशयातील स्टोन? जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 22, 2024 11:30 PM IST

Causes of Gallbladder Stones: प्रौढांच्या ओटीपोटात दुखणे बहुतेकदा पित्ताशयाच्या खड्यांमुळे होते. हे स्टोन कसे तयार होतात, याचे लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

Gallbladder Stone: कशामुळे होतात पित्ताशयातील स्टोन? जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध
Gallbladder Stone: कशामुळे होतात पित्ताशयातील स्टोन? जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध (freepik)

Gallbladder Stone Symptoms and Prevention: पित्ताशयातील स्टोन हे पित्ताशयामध्ये कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिनचे जास्त प्रमाणात तयार झाल्याने आढळून येतात. प्रौढांमध्ये ओटीपोटात दुखणे बहुतेकदा पित्ताशयाच्या खड्यांमुळे होते. वेळीच निदान आणि उपचार यावर मात करण्यास मदत करते. आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय नावाची एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते. हिचे काम जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात सोडणे हे असते. खाललेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतड्यात सोडला जातो. आहारात तेलकट पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा फायबर पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. याचे लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलचे लॅप्रोस्कोपिक ॲण्ड जीआय कॅन्सर सर्जन डॉ. हेमंत जैन यांनी सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पित्ताशयाच्या स्टोनची लक्षणे

सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. या वेदना तीव्र असू शकतात. काही व्यक्तींना वेदना होत नाहीत परंतु त्यांना जास्त गॅसेस, आम्लपित्त, गोळा येणे, जळजळ इ.ची भावना असते. त्याबरोबरच एखादा स्टोन पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतड्यात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर) मध्ये साचू लागतो. त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ असे म्हणतात. यात डोळे आणि लघवी पिवळसर दिसून येते. पाठीत तीव्र वेदना, त्वचेला खाज सुटणे किंवा ताप अशी लक्षणे दिसून येतात.

निदान कसे कराल?

ओटीपोटाच्या अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे पित्ताशयाच्या खड्यांचे निदान केले जाते. काही वेळा एमआरआय आणि सीटी स्कॅन सारख्या प्रगत इमेजिंग पद्धती देखील आवश्यकता भासू शकते.

उपचार काय आहेत?

जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ५-१०% लोकांना पित्ताशयाच्या खड्यांची समस्या असते. पित्ताशयातील खड्यांसंबंधी वरील कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. पित्ताशयाच्या खड्ड्यांसाठी योग्य उपचार म्हणजे दुर्बीणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया. उपचारास विलंब हे भविष्यातील गुंतागुंत वाढवते. पित्ताशयातील खडे व्यवस्थापित करण्यात औषधे फारशी प्रभावी ठरत नाहीत. पित्ताशयावरील शस्त्रक्रिया ही नाभीवरील त्वचेवर लहान छिद्राद्वारे केली जाते (सिंगल चीरा लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी). हे सुरक्षित असून बरे होण्याचा कालावधी देखील कमी करते. प्रत्येकाला शस्त्रक्रियेची आवश्यकता असतेच असे नाही. स्टोनचा आकार, रुग्णाचे वय, स्टोनची जागा इत्यादी अनेक घटकांचा विचार करुन उरचार ठरविले जातात.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचा प्रमाण आणि लठ्ठपणा हे पित्ताचे खडे तयार होण्यासाठी धोकादायक घटक आहेत. त्यामुळे हळूहळू वजन कमी करणे आणि अतिरिकित फॅट्सचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन टाळणे, संतुलित आहार घेणे हे पित्ताशयाचा खडे तयार होण्यास प्रतिबंध करू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग