मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chilled Water: फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय? सावधान! नकळत देताय या आजारांना आमंत्रण

Chilled Water: फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय? सावधान! नकळत देताय या आजारांना आमंत्रण

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 24, 2024 02:49 PM IST

Cold Water Side Effects: आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि व्यक्तीला आजारी बनवते. फ्रीजमधले थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते जाणून घेऊया.

Chilled Water: फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय? सावधान! नकळत देताय या आजारांना आमंत्रण
Chilled Water: फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय? सावधान! नकळत देताय या आजारांना आमंत्रण (unsplash)

Side Effects of Drinking Chilled Water: तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे कडक उन्हातून घरी आल्याबरोबर लगेच फ्रिजमधून थंड पाणी काढून पितात, तर आताच सावध व्हा. आपण नकळतपणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात. होय, जास्त थंड पाणी तुमची तहान भागवू शकते पण हळूहळू ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते. आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि माणसाला आजारी बनवते. फ्रिजचे थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम

पचनास हानी

आयुर्वेदानुसार थंड पाण्यामुळे व्यक्तीची पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे अनेकदा व्यक्तीला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, उलट्या आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पचनाला अग्नी मानले जाते आणि थंड पाणी या प्रक्रियेत अडथळा बनते. अनेक संशोधने असेही सांगतात की थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचित करण्याचे काम करते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम

थंड पाण्याच्या सेवनाने व्यक्तीच्या हृदयाची गती कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार फ्रीजचे खूप थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात. ही मज्जातंतू शरीराच्या अनैच्छिक कार्यांवर नियंत्रण ठेवते. जास्त थंड पाणी प्यायल्याने व्हॅगस मज्जातंतूवर थेट परिणाम होतो. ज्यामुळे हार्ट रेट कमी होते.

डोकेदुखीचे कारण होऊ शकते

कडक उन्हातून घरी परतल्यावर लगेचच फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने काही वेळा मेंदूच्या नसांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. वास्तविक, जास्त थंड पाणी प्यायल्याने मेंदू गोठू शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्याच्या अनेक नसा थंड होऊ शकतात. ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. ही परिस्थिती सायनस ग्रस्त लोकांसाठी एक समस्या बनू शकते.

लठ्ठपणा

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर थंड पाण्याची इच्छा विसरून जा. वास्तविक थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. याउलट फ्रीजच्या पाण्याने शरीरातील चरबी घट्ट होते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणापासून मुक्त होणे अधिक कठीण होते.

घसा खवखवणे

गरजेपेक्षा जास्त थंड फ्रिजचे पाणी प्यायल्याने व्यक्तीला श्लेष्मा तयार होण्याची समस्या होऊ लागते. अशा स्थितीत जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास श्लेष्मा तयार होऊन वायुमार्ग बंद होतो. त्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशात सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel