मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Liver Health Tips: शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात यकृतासंबंधी विकारांचे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका

Liver Health Tips: शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात यकृतासंबंधी विकारांचे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 23, 2024 11:15 PM IST

Liver Disorder: लिव्हर म्हणजेच यकृत हे शरीरातील मुख्य अवयव आहे. याचे विकार झाल्यास आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवू शकतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Liver Health Tips: शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात यकृतासंबंधी विकारांचे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका
Liver Health Tips: शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात यकृतासंबंधी विकारांचे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका (unsplash)

Symptoms of Liver Disorders: यकृत म्हणजेच लिव्हर हे अन्न पचवण्याचे आणि शरीरात पित्त तयार करण्याचे काम करते. यकृत निकामी झाल्यामुळे पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे तुम्हाला पोटाचे अनेक आजार होऊ शकतात. यकृत शरीराला संक्रमणांशी लढण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि कार्बोहायड्रेट साठवण्यास तसेच प्रथिने तयार करण्यास मदत करते. यकृत संपूर्ण शरीर डिटॉक्स करते. यकृताच्या कार्यात अडथळे आल्यास अथवा यकृताला हानी झाल्यास यकृतावर सूज, जखम आणि लिव्हर सिरॉयसिसची समस्या उद्भवते. यकृत योग्यरित्या कार्य करत नसल्यास गंभीर प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते. अति मद्यपान, चरबीयुक्त आहार आणि हॅपिटायटीस सारखे काही विषाणूजन्य संक्रमण यकृताला हानी पोहोचवतात. यकृताची कार्यात अडथळे आल्यास किंवा असामान्य लक्षणे आढळल्यास वेळीच काळजी करा. यकृताचे विकार झाल्याचे कोणत्या लक्षणांवरून कळते याबाबत ग्लेनईगल हॉस्पिटलचे क्लिनिकल लीड ॲडल्ट हेपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचे विभाग प्रमुख डॉ. अमीत मांडोत यांनी माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहेत लक्षणे?

- थकवा - जर तुम्हाला दैनंदिन काम करताना किंवा क्रिया करताना शारीरीक थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःची तपासणी करून घ्या.

- मळमळणे - हे सामान्यतः रक्तप्रवाहात विषारी पदार्थ तयार झाल्यामुळे दिसून येते. यकृताची शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर ढकलण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हे लक्षण दिसून येते.

- फिकट रंगाची विष्ठा ही पित्तविषयक समस्या असू शकते.

- त्वचा किंवा डोळे पिवळे होणे (कावीळ) - हे यकृताच्या समस्यांचे प्रमुख लक्षण आहे. यामध्ये त्वचेला खाज सुटते ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

- जखम - हे तुमच्या यकृताच्या गुठळ्या निर्माण करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे असू शकतात.

- लिव्हर सिऱ्होसिस असलेल्यांसाठी तळव्यांचा रंग लालसर होणे हे देखील चिंतेची बाब असू शकते.

- केशरी ते तपकिरी रंगाची गडद लघवी हे देखील यकृताच्या आजाराचे चिन्ह ठरते. यामध्ये यकृतामधील बिलीरुबिनचे अतिरिक्त प्रमाण दर्शवते.

- जलोदर म्हणजे द्रवपदार्थ टिकून राहिल्यामुळे पोटाची सूज, द्रव साचल्यामुळे पाय आणि घोट्यावर सूज येऊ शकते.

- झोपेचा अभाव - लिव्हर सिऱ्होसिस असलेल्यांना व्यक्तींना झोपेचा त्रास होतो. त्यांना निद्रानाश सारख्या समस्येला तोंड द्यावे लागते.

- स्पायडर अँजिओमास - जर तुमच्या चेहरा आणि पायांवरील त्वचेखाली कोळ्यांसारख्या आकाराच्या केशिका असतील तर ते यकृताचा आजार दर्शवू शकतात. वेळीच निदान आणि उपचार केल्याने रुग्ण बरा होतो.

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे. जास्त मद्यपान केल्याने यकृताची जळजळ, जखम आणि लिव्हर सिऱ्होसिस सारखी समस्या उद्भवू शकते. अल्कोहोलचे व्यसन टाळण्यासाठी आणि आपले यकृत निरोगी ठेवण्यासाठी याची शिफारस केली जाते. लठ्ठपणा हा फॅटी लिव्हर रोगाशी निगडीत आहे. ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास ते अधिक गंभीर स्थितीत वाढू शकते. संतुलित आहार आणि दररोज व्यायाम केल्याने यकृताच्या समस्या टाळण्यास मदत होते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पचनास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग