मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे

Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 27, 2024 08:21 PM IST

Mint Leaves in Summer: उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेपासून आराम मिळवून देण्यासोबतच पुदिन्याची पाने खूप उपयुक्त आहेत. ताजी पाने रिफ्रेशिंग ड्रिंकची चव वाढवतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. हे घरी कसे उगवायचे ते जाणून घ्या

Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे
Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे (unsplash)

Tips to Grow Mint Leaves at Home: उन्हाळ्यात पुदिना आरोग्याचा सोबती ठरू शकतो. जर ते वेगवेगळ्या प्रकारे आहारात घेतले तर अनेक समस्या सहज टाळता येतात. हे नैसर्गिक औषधी वनस्पती वाढत्या तापमानासह शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करत असाल तर ते घरी कसे वाढवायचे ते जाणून घ्या. जेणेकरून या फायद्यांसाठी तुम्ही ताजी पाने सहज वापरू शकता. जाणून घ्या पुदिन्याची पाने वाढवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

शरीराला थंडावा देतो पुदिना

पुदिन्याची कूलिंग प्रॉपर्टी शरीराला थंडावा देतो आणि बॉडी हीटपासून आराम देते. पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल आढळते ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि बॉडी सेंसेशनमध्ये आराम मिळतो. तुमच्या आहारात पुदिन्याची पाने घेण्यासोबतच त्यांना घरी ठेवा.

पचनास मदत करते

कूलिंग इफेक्टसोबतच पुदिन्याची पाने पचनासाठी वापरली जातात. जेवणात पुदिन्याची पाने टाकल्याने पचन सुलभ होते. त्यामुळे सूज येणे, उलट्या होणे, अपचन यांसारख्या समस्याही होत नाहीत. पुदिन्याच्या पानांच्या मदतीने पाचक एंझाइम जलद तयार होतात आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या देखील कमी होतात.

हायड्रेशन वाढवते

सहसा लोकांना पाणी प्यायला आवडत नाही. अशा परिस्थितीत पुदिन्याच्या पानांचे फ्लेवर पाण्यात टाकल्याने त्याची टेस्ट वाढते आणि त्यामुळे द्रव पदार्थाच्या सेवनाचे प्रमाणही वाढते. उष्ण हवामानात डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुदीना मिक्स रिफ्रेशिंग ड्रिंक प्यायल्याने तहान शमते आणि हायड्रेशन देखील मिळते.

तणाव दूर करतो आणि मूड सुधारतो

पुदिन्याच्या पानांचा ताजा वास मूड सुधारण्यास देखील मदत करतो. पुदिन्याची पानांपासून चहा तयार करून प्यायल्यास तापतणाव दूर होऊन शरीर व मन शांत होते. उन्हाळ्यात थंड आणि शांत राहण्यास मदत होते.

आहारात करा पुदिन्याचा समावेश

पुदिन्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी पुदिन्याला वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकता येते. याशिवाय लिंबू किंवा कोणत्याही फळांच्या ड्रिंकमध्ये हे टाकून त्याची चव वाढवता येते.

घरी पुदिना कसा वाढवायचा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही फायदेशीर औषधी वनस्पती तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये सहज वाढवू शकता. हे पाणी आणि माती दोन्हीमध्ये वाढू शकते.

मातीत पुदिना उगवण्याची पद्धत

- छोट्या कुंडीमध्ये माती घेऊन नैसर्गिक खताने सुपीक बनवा. हे लक्षात ठेवा की यामध्ये फुलांसाठी वापरत असलेले खत वापरू नका. त्याऐवजी सेंद्रिय खते घाला.

- आता बाजारातून पुदिना विकत घ्या. ज्या देठांची मुळे आहेत त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा.

- मुळे असलेल्या देठांच्या तळापासून पाने काढून टाका आणि वरच्या बाजूला फक्त पाने राहू द्या.

- आता कुंडीमध्ये पाणी टाका. माती पाणी शोषून घेते तेव्हा लाकडाच्या साहाय्याने लहान छिद्रे करा.

- आता या छिद्रांमध्ये रुजलेले पुदिन्याचे देठ लावा. सुमारे ५ ते ६ देठ लावा आणि तसेच सोडून द्या.

- आता त्यांना बाल्कनीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश किंवा ऊन नसेल. पण अंधार नसावा. नैसर्गिक प्रकाश मिळत राहील याची काळजी घ्या.

- रोज पाण्याने स्प्रे करा. काही दिवसात देठातून पाने निघू लागतील आणि रोप तयार होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel