मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे समर ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी

Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे समर ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 01, 2024 12:24 AM IST

Beat the Heat: वाढत्या तापमानात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा मिळावा म्हणून विविध पेय पिण्याकडे लोकांचा कल असतो. तुम्ही या उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी हे समर ड्रिंक्स पिऊ शकता.

Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी
Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी (unsplash)

Summer Drinks to Beat the Heat: राज्यातील विविध राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४० पार गेला आहे. वाढत्या तापमानात आणि उष्णतेमध्ये आपल्या शरीरातील दोषांचे योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. प्रचंड उष्णतेत प्रवास करणे, काम करणे आणि हालचाल केल्याने असंतुलन उद्भवू शकते. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात पित्त दोष वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अॅसिडिटी, डिहायड्रेशन, मायग्रेन, डोकेदुखी, पोटात अतिरिक्त अम्ल, त्वचेवर पुरळ उठणे, मुरुम, आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास त्रास होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. या उष्णतेवर मात करण्यासाठी येथे सोपे आयुर्वेदिक पेय पिऊ शकतात. हे समर ड्रिंक्स उष्णतेवर मात करण्यासाठी उत्तम आहेत. आयुशक्ती आयुर्वेदच्या आयुर्वेदिक वैद्य डॉ. स्मिता नरम यांनी या उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी उत्तम असे समर ड्रिंक्स सांगितले आहे. जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

उष्णता टाळण्यासाठी समर ड्रिंक्स

कैरीचं पन्हं

कैरीचं पन्हं हे एक पारंपारिक आयुर्वेदिक पेय आहे जे उन्हाळ्यात शरीराला थंड करण्यासाठी उत्कृष्ट आहे. हे कच्च्या आंब्यापासून म्हणजे कैरीपासून बनवले जाते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. या पेयात जिरे, पुदिना आणि गुळाची चव असते. ज्यामुळे त्याची चव तर वाढतेच पण पचनक्रियेत ही मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. कैरीचं पन्हं बनवण्यासाठी कैरी मऊ होईपर्यंत उकळा. नंतर त्याचे साल काढून त्याचा गर काढून घ्या. हे गर एका भांड्यात ठेवा. त्यात पाणी, जिरे, पुदिन्याची पाने आणि गूळ घालून गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण थंड करा आणि त्याच्या ताजेतवाने आणि थंड प्रभावांचा आनंद घेण्यासाठी थंड सर्व्ह करा.

कोकोनट चिया सीड्स वॉटर

नारळ पाणी हे एक नैसर्गिक आणि हायड्रेटिंग पेय आहे जे उन्हाळ्यासाठी आदर्श आहे. इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांमध्ये समृद्ध असलेले हे पेय गमावलेल्या पोषक द्रव्यांची पूर्तता करण्यास आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. कमी कॅलरी आणि साखर यासह हे गोड पेयांना निरोगी पर्याय म्हणून कार्य करते. तुम्ही चिया सीड्सचे पाणी, पुदिन्याची पाने आणि नारळ पाणी घालू शकता.

टरबूज आणि नारळाचे ड्रिंक

टरबूज आणि नारळ पाण्याचे मिश्रण हायड्रेटिंग आहे आणि एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळते. टरबूज आणि नारळाच्या पाण्यात असलेला गोडवा पूर्णपणे ताजेतवाने आणि आनंददायक पेय तयार करण्यासाठी पुरेसा आहे. हे एक आदर्श समर ड्रिंक आहे. कारण ते हलके, हायड्रेटिंग आणि स्वादिष्ट आहे. हे जास्त गोडही नसते.

कोकम शरबत

गार्सिनिया इंडिका फळापासून बनविलेले कोकम शरबत ज्याला आयुर्वेदात 'वृक्षमाला' असेही म्हणतात. हे अँटीऑक्सिडेंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अत्यंत छान ड्रिंक आहे. कोकम शरबत बनविण्यासाठी अर्धे वाळलेले कोकम ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेले कोकम गुळात मिसळून बारीक मिश्रण तयार करावे. कोकमचे मिश्रण एका कढईत जिरे पूड घालून शिजवून थंड होऊ द्यावे. मिश्रण गाळून सर्व्ह करण्यापूर्वी त्यात थंड पाणी घालावे. कोकम शरबत मिश्रण बाजारात उपलब्ध असले तरी घरी ताजे कोकम शरबत तयार केल्याने या आयुर्वेदिक पेयाच्या पूर्ण फायद्यांसह उत्तम चव, पोत आणि सुगंध मिळतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel