मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम

Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम

May 02, 2024, 11:23 AM IST

    • Skin Care Tips: जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर आईस फेशियलचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याचे फायदेच नाही तर त्याचे तोटेही जाणून घ्या. अन्यथा तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.
Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम (freepik)

Skin Care Tips: जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर आईस फेशियलचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याचे फायदेच नाही तर त्याचे तोटेही जाणून घ्या. अन्यथा तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.

    • Skin Care Tips: जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर आईस फेशियलचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याचे फायदेच नाही तर त्याचे तोटेही जाणून घ्या. अन्यथा तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.

Side Effects of Ice Facial: सौंदर्याच्या जगात घरगुती उपायांनी चेहऱ्यावर चमक आणण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. मात्र दीर्घकाळ तरूण राहण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच सकस आहारही आवश्यक आहे. आजकाल चमकदार त्वचेचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांमध्ये आईस फेशियलचा ट्रेंड खूप प्रसिद्ध होत आहे. आइस फेशियलच्या मदतीने त्वचेला ग्लो येतो आणि त्वचा टाइट होते. त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव त्वचेवर लवकर दिसत नाही. जर तुमची त्वचा देखील सेंसेटिव्ह असेल तर आइस फेशियलचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याचे फायदेच नाही तर त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या. अन्यथा तुमच्या त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

आईस फेशियलचे दुष्परिणाम

सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या

त्वचेवर बर्फ चोळल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या उद्भवू शकते हे फार कमी लोकांना माहित असेल. इतकंच नाही तर आईस फेशियलमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्याही वाढू शकते. त्वचेवर सुरकुत्या आणि पुरळ लवकर नको असेल तर चेहऱ्यावर थेट बर्फ लावू नका. ते कापडात बांधून चेहऱ्यावर फार कमी वेळ लावा.

बॅक्टेरियल इन्फेक्शन

जे लोक चेहरा स्वच्छ न करता आईस फेशियल करू लागतात त्यांच्या त्वचेत बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. घाणेरड्या चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया अडकतात.

फोड

त्वचेवर जास्त वेळ बर्फ चोळल्याने त्वचेच्या पेशी मरतात. त्यामुळे त्वचेवर फोड तयार होऊन त्वचा खराब होऊ शकते. आइस फेशियल करताना कोल्ड कॉम्प्रेस किंवा टॉवेल वापरणे चांगले. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बर्फाचे पॅक किंवा क्यूब्स एका मिनिटापेक्षा जास्त काळ ठेवू नका.

सायनस- मायग्रेन

जर तुम्ही सायनस किंवा मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल तर चुकूनही चेहऱ्यावर बर्फ लावू नका. असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात.

डल स्किन

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आइस फेशियल केले जाते. परंतु जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर ते टाळणेच तुमच्यासाठी चांगले राहील. आइस फेशियल केल्याने चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते आणि त्याचा रंगही निस्तेज होऊ शकतो. जर ड्राय स्किन असलेल्या लोकांनी दररोज बर्फाचे फेशियल केले तर त्यांच्या चेहऱ्यावर गुलाबी पुरळ उठू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या