Skin Care for Darker Tone: त्वचा सावळी असो वा गोरी तिची समान काळजी घ्यावी लागते. विशेषतः उन्हाळ्यात सावळ्या त्वचेवर पिगमेंटेशन, पॅच, कोरडेपणा येऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा सावळी स्किन टोन असणाऱ्या लोकांना त्वचेची फारशी काळजी घेणे गरजेचे वाटत नाही. पण सावळी त्वचा असूनही लोकांनी तुमच्या सौंदर्याची स्तुती करावी असे तुम्हाला वाटत असेल तर हे स्किन केअर रुटीन अवश्य फॉलो करा. याने तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यासोबतच त्वचेवर ग्लो येईल.
सर्व प्रथम त्वचा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी केमिकल क्लीन्झरऐवजी नैसर्गिक क्लिन्जर वापरा. ग्रीन टी, एलोवेरा जेल, प्लांट ऑइल यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले क्लीन्सर वापरा. मेकअप काढण्यासाठी नेहमी ऑइल बेस्ड क्लिंजर वापरा. त्यानंतर चेहरा पाण्याने किंवा फोम बेस्ड क्लिंजरने स्वच्छ करा. म्हणजे मेकअप केल्यानंतर त्वचा स्वच्छ करण्यासाठी डबल क्लिन्जर करा.
सावळ्या त्वचेवर जमा झालेली डेड स्किन काढणे फार महत्वाचे आहे. तरच त्वचेवर ग्लो दिसून येईल. नेहमी नैसर्गिक एक्सफोलिएटिंग वापरा. ज्यामुळे त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढेल आणि पेशींचे पुनरुत्पादन होईल. याशिवाय त्वचेचा पोतही सुधारेल.
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट करण्यात आणि मॉइश्चराइझ करण्यात अजिबात निष्काळजी होऊ नका. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि प्लम्पी दिसते. नेहमी आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून ते त्वचेवर जमा झालेले पाणी शोषून फक्त हायड्रेटच नाही तर त्वचेला मॉइश्चरायझ देखील करते.
जर तुम्हाला टॅन आणि हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर सनस्क्रीन नक्कीच लावा. डार्क त्वचेसाठी सुद्धा सनस्क्रीन अत्यंत आवश्यक आहे. अतिनील किरणांमुळे पिगमेंटेशन, स्किन एजिंग आणि टॅनिंग जलद होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या