Does Sunscreen Makes Skin Black: तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. वास्तविक सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे त्वचेला आतून नुकसान करतात. सूर्याच्या या अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावणे योग्य ठरते. सनस्क्रीन वापरण्याबाबत लोकांची खूप वेगळी मते आहेत. काही लोक म्हणतात की सनस्क्रीन लावल्याने त्यांची त्वचा निस्तेज आणि काळी दिसते. पण हे खरंच घडतं का? जाणून घ्या सनस्क्रीनमुळे त्वचा काळी पडते का आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
सनस्क्रीन लावल्याने त्वचा काळी पडते असे जर तुमचा समज असेल तर तसे नाही. खरं तर सनस्क्रीनमध्ये असलेल्या व्हाईट कास्टमुळे तुमची त्वचा डार्क दिसू शकते. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचा काळी दिसली तर घाबरू नका. कारण ते कायमचे होत नाही. त्याचा परिणाम कमी कालावधीसाठीच होतो.
सनस्क्रीन लावण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावण्याच्या मध्ये किमान १५ ते २० मिनिटांचे अंतर ठेवा. लक्षात ठेवा घराबाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा. चेहऱ्याशिवाय मानेवर, कानांवर आणि हेअर लाइनवर सुद्धा सनस्क्रीन लावावे. जर तुम्ही बराच वेळ बाहेर असाल तर दिवसातून दोनदा सनस्क्रीन लावा.
दीर्घकाळ उन्हात राहिल्याने किंवा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात राहिल्याने त्वचेची लवचिकता नष्ट होते आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत त्वचेनुसार योग्य सनस्क्रीन निवडणे खूप महत्वाचे आहे.
- भारतीय हवामानानुसार एसपीएफ ३० (SPF 30) किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन वापरा.
- ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन यूव्हीए, यूव्हीबी, एचआयव्ही लाइट आणि इन्फ्रा-रेड किरणांपासून संरक्षण प्रदान करते. फक्त ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन निवडा.
- जे लोक जास्त काळ बाहेर राहतात, लहान मुले आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांनी मिनरल सनस्क्रीन वापरावे.
- ड्राय, ऑइली आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी विविध प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या त्वचेला सूट होईल असे सनस्क्रीन निवडा.
- त्वचेवर रॅशेस, एक्ने किंवा एलर्जीची समस्या असल्यास, स्वत: कोणतेही सनस्क्रीन निवडण्याऐवजी तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच योग्य सनस्क्रीन निवडा
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)