मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Bicycle Day 2023: रोज किती वेळ सायकल चालवल्याने कमी होईल चरबी? लक्षात ठेवा या गोष्टी

World Bicycle Day 2023: रोज किती वेळ सायकल चालवल्याने कमी होईल चरबी? लक्षात ठेवा या गोष्टी

Jun 03, 2023, 10:51 AM IST

    • Cycling Benefits: दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सायकलिंगच्या फायद्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. वजन कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवावी, ते येथे जाणून घ्या.
वजन आणि चरबी कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवावी

Cycling Benefits: दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सायकलिंगच्या फायद्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. वजन कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवावी, ते येथे जाणून घ्या.

    • Cycling Benefits: दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सायकलिंगच्या फायद्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. वजन कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवावी, ते येथे जाणून घ्या.

Cycling to Lose Weight and Fat: लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला सायकल चालवणे आवडते. हे एक मजेदार अॅक्टिव्हिटी असण्यासोबतच सायकलिंग हा कार्डिओ व्यायामाचा एक प्रकार देखील आहे. जे वजन कमी करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करू शकते. दरवर्षी ३ जून रोजी जगभरात सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सायकलिंगच्या फायद्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. या खास दिवशी वजन आणि चरबी कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवणे योग्य आहे ते येथे जाणून घ्या. तसेच ते करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे समर ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी

Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Curry Masala Powder: आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरीच बनवा हा करी मसाला, जेवण चविष्ट बनवेल ही रेसिपी

Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? आहारात अशा प्रकारे करा लिंबाचा समावेश, होईल फायदा

वजन कमी करण्यासाठी किती वेळ सायकल चालवावी?

अहवालानुसार एखाद्या व्यक्तीने किमान २० ते ३० किमी सायकलिंग केली पाहिजे. तुम्ही एक तास किंवा अधिक सायकल चालवू शकता. जर तुम्ही आता सुरुवात करत असाल तर तुमच्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरेसे आहे. मात्र आपल्या क्षमतेनुसार सायकल चालवणे योग्य आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

जर तुम्ही नुकतीच सायकल चालवायला सुरुवात करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसे की सुरुवातीला सपाट पृष्ठभागावर सायकल चालवणे चांगले आहे. कालांतराने हळूहळू तुम्ही ते चढाच्या रस्त्यावरही चालवू शकता. याशिवाय सायकल चालवण्यापूर्वी काही स्ट्रेचिंग व्यायाम करणे चांगले असते. कारण सायकल चालवल्याने तुमच्या पाठीवर दबाव येऊ शकतो. या प्रकरणात तुमच्या रूटीनमध्ये स्ट्रेचिंगसह काही व्यायाम समाविष्ट करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)